शिक्षक संघाच्या थोरात गटाला मिळाली नोंदणी : संघटनांमधील वाद संपण्याच्या मार्गावर; एकाच नावाच्या होत्या दोन संघटना 

संतोष सिरसट 
Monday, 30 November 2020

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे अनेक दिवसापासून राज्यात शिक्षकांचे दोन गट महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ हे एकाच नाव वापरुन काम करत होत्या पण या पुढे शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यानांच आता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ हे नाव वापरता येईल इतर कोणी या नावाचा गैरवापर केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. 

उत्तर सोलापूर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ या राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सर्वात मोठ्या संघटनेची श्रमिक संघ अधिनियम 1916 अंतर्गत उपनिबंधक श्रमिक संघ कार्यालय पुणे या ठिकाणी नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षक संघ नेमका कोणता या प्रश्नाचे उत्तर आता शिक्षकांना मिळाले आहे. 

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने 10 आक्‍टोंबर 2018 च्या पत्रान्वये राज्यातील जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 व 4 च्या कर्मचारी संघटनेची श्रमिक संघ अधिनियम 1926 अंतर्गत उपनिबंधक कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. 
त्यानुसार शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखालील प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी तर माझ्या आमदार शिवाजीराव पाटील या दुसऱ्या गटाचे अध्यक्ष राजाराम वरुटे यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ या एकाच नावाने उपनिबंधक श्रमिक संघ महाराष्ट्र राज्य कार्यालय पुणे येथे नोंदणीसाठी प्रस्ताव दाखल केले होते. पण उपनिबंधक श्रमिक संघ महाराष्ट्र राज्य पुणे यांनी प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दाखल केलेला प्रस्ताव मान्य करुन त्यांना नोंदणी बाबतचे 5 नोव्हेंबरला प्रमाणपत्र दिले आहे. 

तर राजाराम वरुटे यांनी दाखल केलेला प्रस्ताव अमान्य करुन त्यांना नोंदणी साठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ या नावाऐवजी दुसऱ्या इतर नावाने प्रस्ताव दाखल करण्याबाबत कळविले आहे. यामुळे या पुढे शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखालील व प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे असलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघाला अधिकृत मान्यतेचा मार्ग मोकळा झाला आहे. यापुढे इतर कोणालाही हे नाव वापरता येणार नाही. 

या निर्णयाचे स्वागत प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, कार्याध्यक्ष अंबादास वाजे, सरचिटणीस आप्पासाहेब कुल, एन.वाय.पाटील, विनोद राऊत, जनार्धन निऊंगरे, भक्तराज दिवाने सोमनाथ टकले, अशोक जाधव, अझहरखॉंन पठाण, म. ज. मोरे, आबासाहेब जगताप, महिला आघाडीच्या अध्यक्षा अनुराधा तकटे यांनी केले आहे. 

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे अनेक दिवसापासून राज्यात शिक्षकांचे दोन गट महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ हे एकाच नाव वापरुन काम करत होत्या पण या पुढे शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यानांच आता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ हे नाव वापरता येईल इतर कोणी या नावाचा गैरवापर केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. 

संपादन : अरविंद मोटे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thorat group of teachers gets registration: On the way to end disputes between organizations;