तलवारीने केक कापणे पडले महागात ! हलदहिवडीमध्ये बर्थडे बॉयसह 11 जणांविरोधात गुन्हा 

Birthday
Birthday
Updated on

सांगोला (सोलापूर) : हॉटेलवर वाढदिवसाचा केक तलवारीने कापल्याचे फोटो सोशल मीडियावर टाकणे चांगलेच महागडे पडले आहे. पोलिसांनी या प्रकरणी बर्थडे बॉयसह 11 जणांविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदविला आहे. हा वाढदिवस हलदहिवडी (ता. सांगोला) येथील अजिंक्‍यतारा हॉटेलवर साजरा करण्यात आला होता. ज्या हॉटेलवर हा वाढदिवस साजरा करण्यात आला, त्या अजिंक्‍यतारा हॉटेलवरही कारवाई करण्यात येणार आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, हलदहिवडी (ता. सांगोला) येथील अजिंक्‍यतारा हॉटेल या ठिकाणी अफसर बालीखान शेख (वय 22, रा नागज, ता. कवठे महांकाळ) हा त्याचे पाहुणे मुबारक हिरालाल शेख (रा. हालहिवडी) यांच्याकडे वाढदिवस साजरा करण्यासाठी आला होता. त्याने रविवारी (ता. 14) हॉटेल अजिंक्‍यतारा या ठिकाणी तलवारीने केक कापून त्याचे फोटो काढून वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाचे केक कापल्याचे फोटो व्हाट्‌सऍप, फेसबुक आदी सोशल मीडियावर व्हायरल झाले. ही माहिती पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी याबाबत वाढदिवस साजरा करणाऱ्या विरोधात 15 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला. 

याप्रकरणी अफसर बालीखान शेख (रा. नागज, ता. कवठेमहांकाळ), मुबारक हिरालाल शेख (रा. हलदहिवडी, ता. सांगोला) रफीक पैगंबर शेख, अब्बास कमाल शेख, दिलावर बाबासो शेख, अनिस ऊर्फ बाबासो कमाल शेख, फिरोज पैगंबर शेख (रा. हलदिवडी, ता. सांगोला), चॉंद राजू शेख, अजित मकबूल शेख (रा. ढाळेवाडी, ता. सांगोला), शिवाजी मच्छिंद्र लेंडवे, विक्रम सदाशिव गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. अजिंक्‍यतारा हॉटेलवरही कारवाई करण्यात येणार आहे. 

ही कारवाई उपविभागीय पोलिस आधिकारी दत्तात्रय पाटील, पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक यमगर, पोलिस हेड कॉन्स्टेबल अप्पासाहेब पवार, पोलिस नाईक पर्वते व देशमुख यांनी केली असून, गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक संदीप पर्वते हे करीत आहेत. 

सांगोला तालुक्‍यात 103 गावे असून यापुढे रस्त्यावर, चौकात इत्यादी सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापणे, सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणे अशा प्रकारचे कृत्य जर केले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल. तसेच अशा नागरिकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जाईल व वेळप्रसंगी अशा हुल्लडबाजी करणाऱ्यांना जिल्ह्यातून तडिपार केले जाईल. 
- भगवान निंबाळकर, 
पोलिस निरीक्षक, सांगोला 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com