शहरात आता दररोज एक हजार टेस्ट ! आज 33 ठिकाणी आढळले 51 रुग्ण; 426 रुग्णांवर सुरु आहेत उपचार

तात्या लांडगे
Friday, 26 February 2021

ठळक बाबी...

 • आतापर्यंत शहरातील एक लाख 72 हजार 921 संशयितांची झाली कोरोना टेस्ट
 • शहरात आतापर्यंत आढळले 12 हजार 358 कोरोना पॉझिटिव्ह; सात हजार 346 पुरुषांचा समावेश
 • एकूण रुग्णांपैकी 11 हजार 278 जणांनी केली कोरोनावर मात; 654 जणांचा झाला मृत्यू
 • सध्या शहरातील 86 संशयित होम क्‍वारंटाईन तर 17 जण इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन

सोलापूर : शहरातील कोरोना बाधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर तत्काळ उपचार करता यावे म्हणून महापालिकेने टेस्टिंग वाढविले आहे. आज (शुक्रवारी) 768 संशयितांमध्ये 51 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे शहरात आता ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून सध्या 426 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

ठळक बाबी...

 • आतापर्यंत शहरातील एक लाख 72 हजार 921 संशयितांची झाली कोरोना टेस्ट
 • शहरात आतापर्यंत आढळले 12 हजार 358 कोरोना पॉझिटिव्ह; सात हजार 346 पुरुषांचा समावेश
 • एकूण रुग्णांपैकी 11 हजार 278 जणांनी केली कोरोनावर मात; 654 जणांचा झाला मृत्यू
 • सध्या शहरातील 86 संशयित होम क्‍वारंटाईन तर 17 जण इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन

 

शहरात आज राहूल नगर (बाळे), अशोक चौक, वानकर नगर (जुळे सोलापूर), म्हाडा कॉलनी, लक्ष्मी-विष्णू सोसायटी (कुमठा नाका), वसंत विहार (जुना पुना नाका), अवंती नगर, भिम नगर (जुळे सोलापूर), दक्षिण कसबा, काळजापूर मारुती मंदिराजवळ, आदित्य नगर, स्वामी विवेकानंद नगर, डीसीसी बॅंक कॉलनी (विजयपूर रोड), अलंकापुरी नगर (लक्ष्मी पेठ), मंगळवार पेठ, सनसिटी (दमाणी नगर), वीरशैव नगर, सुदर्शन विहार (रेल्वे लाईन), शेळगी, भवानी पेठ, सिध्दार्थ सोसायटी, बसवनिलय नगर, रंगभवन चौक, सिंधू विहार (जुळे सोलापूर), विजयपूर रोड, दक्षिण सदर बझार, शिवगंगा नगर, गणेश बिल्डर, अरविंदधाम, ऋतु अपार्टमेंट (दमाणी नगर), ओंकार सोसायटी (मजेरवाडी), आसरा सोसायटी, शुक्रवार पेठ या ठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर जोडभावी पेठेतील 50 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 10 फेब्रुवारीपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.


  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: A thousand tests every day in the city now! Today 51 patients were found in 33 places