वैराग व सुर्डी मंडलातील हजारों हेक्‍टरावरील सोयाबीन धोक्‍यात 

vairag soyabean nuksan.jpg
vairag soyabean nuksan.jpg
Updated on

वैराग(सोलापूर) ः बार्शी तालुक्‍यात वैराग मंडल व सुर्डी मंडलामध्ये गेल्या दहा = बारा दिवसांपूर्वी जोरदार पावसाने या भागातील हजारों हेक्‍टरावरील सोयाबीन पिकाला धोका निर्माण झाला आहे. तालुक्‍यात हजार शेतकऱ्यांनी खरिप पिक विमा रक्कम भरली आहे. पाण्याने सोयाबीन पिकाच्या शेंगाला कोंब आल्याने पीक धोक्‍यात आल्याने सोयाबीन पिकाचे पंचनामे त्वरीत करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे. 

जिल्हा कृषी अधिक्षक रवींद्र माने, उपविभागीय कृषी आधिकारी रविद्र कांबळे, जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी सागर बारवकर, भारती एक्‍सापीकविमा कंपनीचे नागेश बोधीधा यांनी तालुक्‍यात गौडगांव मंडल व पांगरी मंडलातील शेत शिवारात जाऊन भेट देवुन सोयाबीन पिकाची पाहणी केली. 

त्याप्रमाणे सुर्डी मंडलातील पाण्यात भिजलेल्या सोयाबीन पिकांचे पंचनामे कधी होणार याकड़े सर्व शेतकरी वर्ग डोळे लावुन बसला आहे. सप्टेंबर अखेर मुंगशी (वा), इर्ले, इर्लेवाडी, ढोराळे, तडवळे, सुर्डी, यावली, वैराग येथे सायंकाळी पाच वाजल्यासुन रात्रभर जोराचा पाऊस पडल्याने सोयाबीन पिके पाण्याखाली गेल्याने शेंगा काळ्या पडून कोंब आले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. 
यावर्षी जुनच्या पहिल्या आठवडयात मृगाचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे बियाणे खराब निघाल्याने दुबार पेरणी केली आहे. बार्शी तालुक्‍यात यावर्षी हजार हेक्‍टरवर सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. खरीप पिकांचा हजार शेतकऱ्यांनी खरिप पिक विमा रक्कम भरली आहे. आतापर्यंत सप्टेंबर अखेर 488 मिमी पाऊस पडतो परंतु आतापर्यंत 532 मिमी पाऊस पडला आहे. 
गतवर्षी आक्‍टोंबर महिन्यात अशी परिस्थीती निर्माण झाली होती. परंतु यावर्षी जास्त पाऊस पडल्याने वैरागभागातील भोगावती, नागझरी या नदीनाल्यासह ओढ्यांना पूर आले. या मुळे पिकांची काढणी धोक्‍यात आली. काढणी पश्‍चात नुकसान उत्पादनापेक्षा पन्नास टक्‍क्‍या पेक्षा कमी उत्पादन होत असेल तर शेतकऱ्यांना विमा कंपन्या कडून नुकसान भरपाई देण्याबाबत सकारात्मक विचार होतो. 
त्यामुळे नुकसान पिकांचे पंचनामे करून जिल्हा कृषी अधिकारी रविद्र माने यांनी प्रयत्न करावे अशी मागणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याकडून केला जात आहे. वर्गातुन होत आहे. 

नुकसानभरपाई देण्यात यावी 
खरीप हंगामात वारंवार हवामान बदल व जोरदार पाऊस झाला. याचा फटका सोयाबीन पिकास बसला. पिक पाण्यात सापडले आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाल्याने वैराग, सुर्डी मंडळात पंचनामे करून विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई द्यावी. 
चांगदेव पौळ, शेतकरी, वैराग, ता. बार्शी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com