मामासह दोन भाच्यांवर काळाची झडप; अक्कलकोट तालुक्‍यात विहिरीत बुडून तिघांचा मृत्यू 

चेतन जाधव 
Thursday, 1 October 2020

आजी-आजोबाकडे आलेल्या नातवंडावर काळाने झडप घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने देशमुख बोरगाव गावावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी आजी आजोबांसह नातेवाईकांचा आक्रोश दिसून येत होता. घटनास्थळी पोलिस हवालदार अजय भोसले व पोलिस नाईक अरुण राऊत यांनी भेट दिली. 

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यातील देशमुख बोरगाव येथे शेतातील विहिरीवर पोहण्यासाठी गेलेले मामा व दोन भाच्चे अशा तिघांचा पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (गुरुवारी) दुपारी साडेचारच्या दरम्यान घडली. अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. 
या घटनेची माहिती बंडोपंत संतराम धर्मसाले (वय 48, रा. माकणी, ता. लोहारा) यांनी उत्तर पोलिस ठाण्यात दिली आहे. शिवराम मोतीराम गवळी (वय 26, रा. बोरगाव, ता. अक्कलकोट), युवराज सुनील छत्रबंद (वय 14, रा. सोलापूर), समर्थ बंडू धर्मसाले (वय 16, रा. माकणी, ता लोहारा) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. मोतीराम गवळी यांच्या घरी जावळ काढण्याचा कार्यक्रम होता. त्यामुळे घरातील धुतलेले कपडे आणण्यासाठी हे तिघे गेले होते. विहिरीत पोहण्यासाठी पाण्यात उतरले असता पाण्याचा खोलीचा अंदाज आला नाही. या युवराज सुनील छत्रबंद, समर्थ बंडू धर्मसाले हे दोन भाच्चे व मामा शिवराम गवळी या तिघांचा बुडून मृत्यू झाला. आजी-आजोबाकडे आलेल्या नातवंडावर काळाची झडप घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने देशमुख बोरगाव गावावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी आजी आजोबांसह नातेवाईकांचा आक्रोश दिसून येत होता. घटनास्थळी पोलिस हवालदार अजय भोसले व पोलिस नाईक अरुण राऊत यांनी भेट दिली. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three drowned in a well in Akkalkot taluka