पंढरपूर-मोहोळ रस्त्यावरील गोसावीवाडी येथे ट्रक व रिक्षाच्या अपघातात तीन ठार, चार जखमी 

अभय जोशी 
Saturday, 7 November 2020

ट्रकने रिक्षाला समोरासमोर धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात रिक्षातील तीन जण ठार झाले तर अन्य चारजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात पंढरपूर - मोहोळ रस्त्यावरील गोसावीवाडी जवळ दुपारी साडेतीनच्या सुमारास झाला. 

पंढरपूर (सोलापूर) : ट्रकने रिक्षाला समोरासमोर धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात रिक्षातील तीन जण ठार झाले तर अन्य चारजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात पंढरपूर - मोहोळ रस्त्यावरील गोसावीवाडी जवळ दुपारी साडेतीनच्या सुमारास झाला. 

या अपघाताबाबत समजलेली माहिती अशी, की पंढरपूरहून मोहोळकडे निघालेला ट्रक (एमएच 13 सीयू 5466) आणि मोहोळच्या बाजूने पंढरपूरकडे येणाऱ्या रिक्षाची (एमएच 13 एडी 893) समोरासमोर धडक झाली. दोन्ही वाहने वेगात असल्यामुळे झालेल्या या भीषण अपघातात रिक्षामधून प्रवास करणाऱ्या सात जणांपैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चारजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त रिक्षाचा अक्षरश: चक्काचूर झाला. 

जखमींना पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत. अपघातातील मृतांपैकी एका व्यक्तीचे नाव संदीप कोळी असून तो पंढरपूर तालुक्‍यातील आंबे गावचा रहिवासी आहे. अन्य जखमी व मृत एकमेकाचे नातेवाईक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three killed, four injured in truck-rickshaw accident at Gosaviwadi on Pandharpur-Mohol road