सराफाला लुटले; तीन लाख ३१ हजाराचे दागिने चोरीला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 March 2020

कुर्डुवाडी (सोलापूर) : दुकान बंद करुन मोटारसायकलवरुन घरी परतत असणाऱ्या सराफाची तीन लाख ३१ हजार रुपये किमतीचे दागिने असलेली बॅग चार चोरट्यांनी हिसकावून पलायन केले. ही घटना मुंगशी-नाडी रस्त्यावर गुरुवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. हनुमंत माणिक तांबे ( रा नाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात याची मध्यरात्री नोंद करण्यात आली.

श्री तांबे यांचे परंडा (जि. उस्मानाबाद) येथे सोने चांदी दागिने विक्रीचे दुकान आहे. गुरुवारी संध्याकाळी दुकान बंद करुन बॅगेत सुमारे १३ तोळ्याचे सोन्याचे दागिने व तीन किलो चांदी घेतले. त्याचे मदतनीस अंबादास गोफणे यांच्याबरोबर मोटारसायकलने परांड्याहुन नाडीला निघाले. मुंगशी ते नाडी या कच्च्या रस्त्यावर दोन मोटारसायकल वरुन आलेल्या चार चोरट्यांनी फिर्यादीच्या गाडीला त्यांची गाडी अाडवी लावली. त्या चौघांनी तोंडाला रुमाल बांधले होते. फिर्यादीकडील दोन बॅग, दोघांचे दोन मोबाईल हिसकावून घेतले व बिटरगावच्या रस्त्याने पलायन केले. यामध्ये दोन लाख ६० हजार रुपये किमतीचे १३ तोळ्याचे सोन्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, ६० हजार रुपये किमतीचे तीन किलो वजनाचे चांदीचे दागिने, ११ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल रजिस्टर असे तीन लाख ३१ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेला. घटना समजताच लगेच सदर ठिकाणी सहायक पोलि निरीक्षक चिमणाजी केंद्रे पोहोचले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three lakhs gold theft in Kurdwadi