पंढरपूरमध्ये आणखी तिघाजणांना झाला कोरोना 

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 1 जुलै 2020

दोन दिवसापूर्वी ऐन आषाढी यात्रेत पंढरपूर शहरात राहणाऱ्या सात जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर पुन्हा आज शहरातील टाकळी रस्त्यावरील गजानन नगर आणि पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या मागील भागात राहणाऱ्या प्रत्येकी एक अशा दोन व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तथापि तालुका पोलिस ठाण्याच्या पाठीमागील ज्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे ती व्यक्ती 24 जून पासून सोलापूर येथे मुक्कामास आहे. 

पंढरपूर(सोलापूर)ः पंढरपूर शहरातील दोन व्यक्तींचे आणि तालुक्‍यातील शेगाव दुमाला येथील एका महिलेचा कोरोनारिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहर व तालुक्‍यातील रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. 

हेही वाचाः तापमानाच्या अचूक नोंदीसाठी हेडबॅंड 

दोन दिवसापूर्वी ऐन आषाढी यात्रेत पंढरपूर शहरात राहणाऱ्या सात जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर पुन्हा आज शहरातील टाकळी रस्त्यावरील गजानन नगर आणि पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या मागील भागात राहणाऱ्या प्रत्येकी एक अशा दोन व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तथापि तालुका पोलिस ठाण्याच्या पाठीमागील ज्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे ती व्यक्ती 24 जून पासून सोलापूर येथे मुक्कामास आहे. 
चंद्रभागा नदीच्या पैलतीरावर असलेल्या शेगाव दुमाला गावातील एका महिलेचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला आहे. रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. 
दोन दिवसांपूर्वी पंढरपूर शहरातील सात जणांचे कोरोना रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले आहेत. एका पक्षाचे शहराध्यक्ष, बॅंकेचे संचालक, एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या गाडीचा ड्रायव्हर आदींचा त्यामध्ये समावेश होता. या सर्वांना वाखरी येथील कोव्हिडकेअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. यात्रेच्या नियोजनात प्रशासन व्यस्त असताना शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. शहरातील ऍक्‍टिव रुग्णांची संख्या आता 11 झाली आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three more got corona positive in pandharpur