esakal | सोलापुरातील तीन हजार 191 रुग्णांनी कोरोनाला हरिवले! आज नव्या 54 रुग्णांची भर; एकाचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

corona-positive-1585803595 - Copy.jpg

ठळक बाबी... 

  • शहरातील 35 हजार 687 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात सापडले पाच हजार 104 कोरोना पॉझिटिव्ह 
  • शहरातील 365 रुग्णांचा झाला कोरोनाने मृत्यू; तीन हजार 191 रुग्णांची कोरोनावर मात 
  • विजयपूर रोडवरील कमला नगरातील 72 वर्षीय महिलेचा कोरोनाने घेतला बळी 
  • शहरातील संस्थात्मक विलगीकरणात 488 संशयित; दोन हजार 681 व्यक्‍ती होम क्‍वारंटाईन 

सोलापुरातील तीन हजार 191 रुग्णांनी कोरोनाला हरिवले! आज नव्या 54 रुग्णांची भर; एकाचा मृत्यू 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : शहरात आज पुन्हा नव्या 54 रुग्णांची भर पडली असून एकाचा मृत्यू झाला आहे. रविवारी (ता. 2) शहरातील 130 रुग्णांनी कोरोनावर मात करीत घर गाठले. अद्याप एक हजार 548 रुग्ण शहरातील विविध रुग्णलयांमध्ये उपचार घेत आहेत. 

स्वामी विवेकानंद, मल्लिकार्जुन नगर (हत्तुरे वस्ती), साई नगर (होटगी रोड), नेहरु नगर, जानकी नगर (जुळे सोलापूर), मामलेदार प्लॉट (कुमठे), विडी घरकूल, राघवेंद्र नगर, तक्षशिला नगर (कुमठा नाका), श्रध्दा एम्पायर (रामलाल चौक), सिध्दार्थ सोसायटी, मुकुंद नगर (भवानी पेठ), हब्बू वस्ती (देगाव नाका), गांधी नगर, शिक्षक सोसायटी (सदर बझार), चंडक बागेजवळ, मंत्री चंडक, मेहता नगर (शेळगी), रविवार पेठ, लक्ष्मी नगर, गणेश नगर (बाळे), अशोक चौक, हुच्चेश्‍वर नगर, सोरेगाव, राहूल नगर, संगीता अर्पाटमेंट (होटगी रोड), सुंदरम नगर, लक्ष्मी चाळ, न्यू पाच्छा पेठ, कोंडा नगर, आंबेडकर नगर, मसरे गल्ली, आंबराई, उत्कर्ष नगर या ठिकाणी आज नव्या रुग्णांची भर पडली आहे. 