शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर हे वाचाच... (VIDEO)

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

विराज अभ्यासातही हुशार 
विराज मैदानी खेळाबरोबर अभ्यासात देखील प्रचंड हुशार आहे. शाळेतून घरी आल्यावर आधी घरचा अभ्यास पूर्ण करतो. त्यानंतर काही वेळाची विश्रांती घेऊन पुन्हा आपल्या मैदानी खेळाच्या सरावावर भर देतो. या खेळातून व्यायामाबरोबरच त्याचे चांगले मनोरंजन होते. त्याला मोबाईलपेक्षा ही मैदानी खेळ खूप आवडतात.
- शिवराज पवार, वडील

सोलापूर  : येथील साडेतीन वर्षांचा विराज तलवारबाजी, दांडपट्टा व  लाठीकाठी या सारख्या मैदानी खेळांतून लोकांचे लक्ष वेधतोय. सण, समारंभ आणि जयंती उत्सव कार्यक्रमात तो चित्तथरारक खेळाचे प्रदर्शन करतोय. विराज शिवराज पवार असे त्याचे पूर्ण नाव.  

हेही वाचा - सोलापूर महापालिकेचे अंदाजपत्रक 2020

आजोबाकडून केली कला आत्मसात
चिमुरडा विराज भली मोठी काठी शरीराभोवती गरगर फिरवू लागतो आणि पाहणाऱ्याच्या अंगावर शहारे उमटतात. तलवारबाजी, दांडपट्टा व लाठीकाठी हे खेळ त्याने आजोबा राजकुमार पवार यांच्याकडून आत्मसात केले आहेत. राजकुमार पवार हे दांडपट्टा तलवारबाजी आणि लाठीकाठी चालवण्यात पारंगत आहेत. विविध कार्यक्रमात ते या खेळाचे प्रदर्शन करतात. विविध सण समारंभ आणि कार्यक्रमात ते फेटे बांधण्याचा व्यवसाय करतात. क्षत्रिय गल्लीत राहणारे पवार हे फेटेवाले म्हणून प्रसिद्ध आहेत.

हेही वाचा - गुंठेवारी नियमित करण्यासाठीची डेडलाईन 

एक वर्षाचा असल्यापासून सराव
विराज रोजच्या सरावामुळे या खेळात आता पारंगत होत चालला आहे. तो एक वर्षाचा असल्यापासून या खेळांचा सराव करतो. त्याचा हा खेळ सर्वांसाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे. सोशल मीडियात देखील त्याच्या या चित्तथरारक  खेळाचे कौतुक होत आहे. बालवयातच कमावलेले हे कौशल्य 
त्यांच्या पालकांच्याही अभिमानाचा व कौतुकाचा झाला आहे. आपल्या छोट्या-छोट्या बोटांमध्ये धरलेली काठी सराईत खेळाडूप्रमाणे शरीराभोवती गोलाकार फिरवत आपले शौर्य दाखवतो. विजेच्या चपळाई सारखा दांडपट्टा (तलवार) सहजगत्या फिरवू लागतात तेव्हा डोळे विस्फारतात.

मर्दानी खेळाची आवड 
विराजला देखील या शिवकालीन मर्दानी खेळाची आवड आहे.  सध्या तो एल.के.जी च्या नर्सरी वर्गात शिकतोय. रोज एक तास या मर्दानी खेळाचा सराव करतोय. हे खेळ तो पारंपारिक शिवकालीन वेशभूषेत सादर करतो. त्यामुळे त्याचा खेळ लोकांना अधिक भावतो. त्याने सादर केलेल्या मर्दानी खेळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहेत. 

चला पाहूया विराजचा चित्तथरारक खेळ (VIDEO) 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three years old viraj of solapur expert in Swordsmanship