नागरिकांनी अनुभवला "येथील' "मॉक ड्रील'चा थरार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

शांतता राखण्याचे आवाहन करूनही गोंधळ घालणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी सुरवातीला वरुण वाहनाच्या माध्यमातून पाण्याचा मारा केला. त्यानंतर अश्रुधुराच्या कांड्या फोडल्या, लाठीमार करण्यात आला आणि मग शेवटी गोळीबार करण्यात आला.

 

सोलापूर : शहर पोलिस दलाच्या वतीने शनिवारी जगदंबा चौकात दंगा नियंत्रण संदर्भात मॉक ड्रील करण्यात आला. आंदोलनकर्त्यांवर पोलिस कशाप्रकारे नियंत्रण आणतात, हे या वेळी दाखविण्यात आले.

नागरिकांनी अनुभवला थरार
शांतता राखण्याचे आवाहन करूनही गोंधळ घालणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी सुरवातीला वरुण वाहनाच्या माध्यमातून पाण्याचा मारा केला. त्यानंतर अश्रुधुराच्या कांड्या फोडल्या, लाठीमार करण्यात आला आणि मग शेवटी गोळीबार करण्यात आला. ही सर्व प्रक्रिया कशाप्रकारे चालते, हे नागरिकांनी पाहिले. मॉक ड्रीलचा थरार अनुभवला. सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे यांच्या नेतृत्वाखाली हा मॉक ड्रील करण्यात आला. या वेळी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त अभय डोंगरे, सदर बझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे, पोलिस निरीक्षक संजय पाटील, विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट, सुरक्षा शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक वैभव माळी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कायदा व सुव्यवस्था राखताना जर काही घडले तर पोलिसांची तयारी असावी, यासाठी जगदंबा चौकात मॉक ड्रील घेण्यात आला. या माध्यमातून नागरिकांनाही पोलिसांच्या सज्जतेची माहिती होते.
- डॉ. प्रीती टिपरे,
सहायक पोलिस आयुक्त


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The thrill of the mock drill