को-मॉर्बिड रुग्णांच्या टेस्टिंगवर भर; आज शहरात 59 पॉझिटिव्ह अन्‌ चौघांचा मृत्यू 

तात्या लांडगे 
Friday, 11 September 2020

शहरातील रुगणसंख्या आता सात हजार 363 झाली आहे. तर मृतांची संख्या 440 वर पोचली आहे. शहरातील संशयितांच्या टेस्टिंगचे प्रमाण निम्म्याने कमी झाले असून आता महापालिकेने मृत्यूदर रोखण्याच्या हेतूने को-मॉर्बिड रुग्णांच्या टेस्टिंगवर भर दिला आहे. शहरात आज 59 रुग्ण नव्याने सापडले असून चौघांचा मृत्यू झाला आहे. 

सोलापूर : शहरातील रुगणसंख्या आता सात हजार 363 झाली आहे. तर मृतांची संख्या 440 वर पोचली आहे. शहरातील संशयितांच्या टेस्टिंगचे प्रमाण निम्म्याने कमी झाले असून आता महापालिकेने मृत्यूदर रोखण्याच्या हेतूने को-मॉर्बिड रुग्णांच्या टेस्टिंगवर भर दिला आहे. शहरात आज 59 रुग्ण नव्याने सापडले असून चौघांचा मृत्यू झाला आहे. 

किसाननगर (अक्‍कलकोट रोड), कर्णिकनगर, एसआरपी कॅम्प (सोरेगाव), शिवगंगा नगर (नई जिंदगी), गोकूळ निवास (दक्षिण सदर बझार), जिजामाता नगर (स्वागत नगर), भवानी पेठ, राणा प्रताप नगर, जवाननगर, द्वारकानगर (विजयपूर रोड), शिवगंगा नगर, बॅंक ऑफ इंडिया कॉलनी, जानकीनगर, स्नेहल पार्क, अमोलनगर, ज्ञानेश्‍वर हौसिंग सोसायटी (जुळे सोलापूर), बॉम्बे पार्क, एनजी मिल कॉलनी, शंकरनगर, मेकॅनिक चौक, दक्षिण सदर बझार, गोल्डफिंच पेठ, साईसृष्टी रो हाऊस, दमाणी नगर, इंद्रधनू अपार्टमेंट, बाबूराव नगर (गळवी वस्ती), एकता नगर, नीलम नगर (लक्ष्मी नगर), उत्तर कसबा, मोदीखाना, निर्मिती विहार, केशव नगर (गांधी नगर), लिमयेवाडी, वृंदावन सोसायटी, रामलिंग सोसायटी, दक्षिण कसबा, साखर पेठ, हर्षवर्धन सोसायटी (रेल्वेलाइन), अंत्रोळीकर नगर, गवळी वस्ती, महेश नगर (प्रभाकर महाराज मंदिराजवळ), मुरारजी पेठ, अमरनाथ सोसायटी (शेळगी), ज्ञानेश्‍वर नगर (मजरेवाडी), लतादेवी नगर (कुमठा नाका), हत्तुरे वस्ती (होटगी रोड) आणि नाकोडा युनिटी (जुना पुना नाका) याठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली आहे. 

ठळक बाबी... 

  • शहरातील 70 हजार 947 संशयितांची पूर्ण झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात आढळले सात हजार 363 व्यक्‍ती पॉझिटिव्ह 
  • शहरातील मृतांची संख्या झाली 440; सध्या 799 रुग्णांवर उपचार 
  • शहरातील सहा हजार 124 रुग्णांनी केली कोरोनावर मात 
  • महापालिकेने मृत्यूदर कमी करण्यासाठी को-मॉर्बिड रुग्णांच्या टेस्टिंगवर दिला भर 

चौघांचा झाला मृत्यू 
गणेश पेठ (कोंतम चौक) येथील 42 वर्षाचे पुरुष, सिद्धेश्‍वर नगर (मजरेवाडी) येथील 51 वर्षाची महिला, किसाननगर (अक्‍कलकोट रोड) परिसरातील 60 वर्षाची महिला, उत्तर कसबा परिसरातील 56 पुरुषाचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Today fifty nine corona positive patients were found in the city and four died