रुग्णांनी ओलांडला पाचशेचा टप्पा ! नगरसेवकांच्या नियोजनामुळे 23 नंबर प्रभागातील कोरोना येतोय आटोक्‍यात

तात्या लांडगे
Friday, 20 November 2020

प्रभागासंबंधी ठळक बाबी...

 • एकूण 503 व्यक्‍ती कोरोना बाधित
 • आतापर्यंत 440 रुग्णांची कोरोनावर मात
 • एकूण रुग्णांपैकी 22 जणांचा मृत्यू
 • सध्या 41 रुग्णांवर सुरू आहेत उपचार

सोलापूर : शहरातील न्यू पाच्छा पेठेत पहिला रुग्ण सापडल्यानंतर झपाट्याने वाढणारा कोरोना आटोक्‍यात येण्यासाठी सुरवातीला महापालिकेच्या माध्यमातून म्हणावे तसे प्रयत्न झाले नाहीत. मात्र, आपला प्रभाग सुरक्षित राहावा म्हणून नगरसेवकांनी व त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या धडपडीतून प्रभाग 23 मधील प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे.

प्रभागासंबंधी ठळक बाबी...

 • एकूण 503 व्यक्‍ती कोरोना बाधित
 • आतापर्यंत 440 रुग्णांची कोरोनावर मात
 • एकूण रुग्णांपैकी 22 जणांचा मृत्यू
 • सध्या 41 रुग्णांवर सुरू आहेत उपचार

 

सलगर वस्ती, सेटलमेंट परिसर, राजस्व नगर, आदित्य नगर, सैफूल, सोरेगाव, वृंदावन सोसायटी, नितीन पार्क, निर्मिती विहार, सैफूल, सोरेगाव, माशाळ वस्ती, नवीन आरटीओ कार्यालय, शहा नगर याठिकाणी आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मागील तीन दिवसांत या प्रभागात सात रुग्णांची भर पडली आहे. तत्पूर्वी, गोरगरिब कामगारांची संख्या असलेली काही नगरे आता कोरोनामुक्‍त झाली आहेत. प्रभाग कोरोनामुक्‍त व्हावा, प्रभागातील को- मॉर्बिड तथा अन्य नागरिक कोरोनाचे बळी ठरू नयेत म्हणून नगरसेविका सुनिता रोटे, मेनका राठोड, नगरसेवक उमेश गायकवाड यांच्यासह कोरोना वॉरिअर्सनी मोठे परिश्रम घेतले. 50 हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या या प्रभागात नगरांसह एकूण 164 सोसायट्या असून परिसरातून कोरोना हद्दपार होण्यासाठी नागरिकांनी आता नियमांचे पालन करायला सुरवात केली आहे.

   

  कुटुंबासह अनेकांनी केली कोरोना काळात मदत
  प्रभागातील सर्वच कुटूंब सुरक्षित राहावीत म्हणून आम्ही कुटुंबासह घराबाहेर पडलो. सुरवातीला जनजागृतीवर भर दिला. त्यानंतर विविध नगरांमध्ये रॅपिड ऍन्टीजेन टेस्टची मोहीम घेतली. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून संशयितांना औषधे दिली. सुरवातीला कडक लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर उदरनिर्वाहासाठी गोरगरिब घराबाहेर पडणार नाहीत, याची खबरदारी घेतली. त्यामुळे काही नगरे, सोसायट्या कोरोनामुक्‍त झाल्या.
  - सुनिता रोटे, नगरसेविका

  कोरोना काळात उत्कृष्ट काम करुन झाल्या कोरोना महायोध्दा
  प्रभागातील सोसायट्यांमध्ये रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट व आरोग्य शिबिरेही राबविली. नागरिकांच्या मनातील भिती दूर करुन आम्ही कोरोना वॉरिअर्सच्या माध्यमातून डॉक्‍टरांना सेवा करण्याची संधी उपलब्ध करुन दिली. उत्कृष्ट काम पाहून कोरोना महायोध्दा म्हणून सामाजिक संस्थांकडून पुरस्कारही मिळाले. प्रभागातील व परराज्यातील, परजिल्ह्यातील कामगारांनाही धान्य वाटप केले.
  - मेनका राठोड, नगरसेविका

  नागरिकांच्या साथीने लवकरच प्रभाग होईल कोरोनामुक्‍त
  सलगर वस्ती, सेटलमेंट परिसर, राजस्व नगर, आदित्य नगर, वृंदावन सोसायटी या परिसरातील वाढलेला कोरोना आता हद्दपार होऊ लागला आहे. तत्पूर्वी, नागरिकांच्या मनातील भिती दूर करणे, त्यांना मास्क, धान्य वाटप करणे, आरोग्य शिबिरांचे आयोजन, औषधांचे वाटप, फवारणी अशी कामे प्राधान्याने केली. त्याचा आता परिणाम दिसू लागला आहे.
  - उमेश गायकवाड, नगरसेवक
   


  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: Total Patients 503 ! Due to the planning of the corporators, Corona from Ward No. 23 is coming under control