सोलापुरी कोवळ्या लुसलुशीत हुरड्याची पडतेय पुणे-मुंबईच्या पर्यटकांना भुरळ ! 

hurda party.jpg
hurda party.jpg

सोलापूरः जिल्ह्यात हुरडा खाण्यासाठी यावर्षी पुणे व मुंबईतून येणाऱ्या पर्यटकांची संख्या चांगलीच वाढली आहे. मोठ्या वाहनातून येणाऱ्या या पर्यटकांनी हुरड्याचा आस्वाद घेताना जिल्ह्यातील अनेक ठिकाणी भेटीदेखील दिल्या. वर्षभरातील मुख्य पर्यटन उत्सवाशिवाय आता हुरड्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या चांगलीच वाढली आहे. लॉकडाउननंतर घराबाहेर पडून या पर्यटकांनी सहलीचा आनंद घेतला. 
मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात हुरडा पार्टीचे आयोजन केले जात आहे. मात्र यावर्षी कोरोनामुळे त्याला कितपत प्रतिसाद मिळेल, अशी शंका होती. त्यात मोठ्या प्रमाणात हुरड्याची विक्रीदेखील जिल्ह्याबाहेरील शहरात झालेली होती. त्यानंतरदेखील पर्यटकांनी खासगी वाहने करून सोलापूर जिल्ह्यात हजेरी लावली. सहकुटुंब सहलीचा आनंद घेत हे पर्यटक सोलापुरात येत होते. 
शहराबाहेर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात सावलीची सोय करुन तेथे तयार हुरडा उपलब्ध करुन दिला होता. हुरड्याचा आनंद घेत पर्यटकांनी तेथेच थांबून नंतर भोजनाचादेखील आस्वाद घेतला. यासोबत पर्यटकांनी सिध्देश्‍वर मंदिर, अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरासह विविध स्थळांनादेखील भेटी दिल्या. यावर्षी पुणे व मुंबई भागातील काही उद्योगसमूहांनीदेखील त्यांच्या कर्मचाऱ्यांना सहकुटुंब सहलीचे आयोजन करुन दिले होते. याशिवाय अनेकजण स्वतःचे कुटुंब घेऊन खासगी वाहनाने आले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी हुरडा पार्टीसाठी येणारे पर्यटकांची संख्या वाढली आहे. 


शिणवटा घालवण्यासाठी... 
- यावर्षी लॉकडाउनचा ताण घालवण्यासाठी पर्यटकांची अधिक हजेरी 
- उद्योगसमूहाकडून हुरडा पार्टी सहलीचे आयोजन 
- पुणे व मुंबईतून हजारो पर्यटकांची भेट 
- हुरडा पार्टीनंतर धार्मिक स्थळांना दिल्या भेटी 

हुरड्यासाठी हमखास सोलापूरला भेट 
मी सलग दोन वर्षांपासून हुरडा पार्टीसाठी येत असतो. यासाठी वाहतुकदार व हुरडा उत्पादक शेतकरी सातत्याने सहकार्य करतात. त्यामुळे पुणे भागातून येणाऱ्या पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. 
-दामोदर करवा, पर्यटक पुणे  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com