esakal | कमी दराने उडीद खरेदी करुन शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी फसवले; फरक न दिल्यास आंदोलन 
sakal

बोलून बातमी शोधा

Traders deceived farmers by buying urad at a lower rate in September

व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून हामी भावापेक्षा कमी किंमतीने उडीद व इतर धान्य खरेदी केले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना पत्र दिले आहे.

कमी दराने उडीद खरेदी करुन शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी फसवले; फरक न दिल्यास आंदोलन 

sakal_logo
By
अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून हामी भावापेक्षा कमी किंमतीने उडीद व इतर धान्य खरेदी केले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना पत्र दिले आहे.

सपटेंबरमध्ये उडीद व इतर कडधान्य मोठ्याप्रमाणात कृषी उत्पन्न बाजार समीतीमध्ये विक्री झाली. इतिहासात पहिल्यांदा उडीदाची फार मोठी आवक करमाळा कृषी उत्पन्न बाजार समीतीमध्ये झाली. याचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी हामी भावापेक्षा उडीद व इतर कडधान्ये कमी भावाने खरेदी कले. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक व्यापाऱ्यांनी केली आहे. या गोष्टीकडे कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती व संचालक यांनी लक्ष दिले नाही. 

सरकारने शेतकऱ्यांचा उडीद व इतर कडधान्ये विक्री झाल्यावर हामी भाव केंद्र सुरू केले. उशीरा सुरू केलेल्या हामी भाव केंद्रामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. सप्टेंबरमध्ये व्यापाऱ्यांनी हामी भावापेक्षा कमी किंमतीने उडीद इतर धान्य खरेदी केले. त्या शेतकऱ्यांना उर्वरीत राहीलेली फरकाची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी  सहकार व पनन मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. 

मंत्री महोदयांना पत्र देऊनही शेतकऱ्यांना हामी भावाच्या फरकाची रक्कम नाही मिळाल्यास शेतकऱ्यांना घेऊन करमाळा कृषी उत्पन्न बाजार समीतीविरोधात तिव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे कदम यांनी सांगितले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

go to top