रेल्वेचा मोठा निर्णय ! प्रवाशांना मिळणार 100 टक्‍के परतावा 

तात्या लांडगे
शनिवार, 11 एप्रिल 2020

ठळक मुद्दे... 

  • लॉकडाउनमध्ये 30 एप्रिलपर्यंत वाढ : केंद्रीय रेल्वे बोर्डाची तातडीची बैठक 
  • ऑनलाइन बुकिंग केलेल्या प्रवाशांना ऑनलाईनच मिळणार परताव्याची रक्‍कम 
  • आता पुढील निर्णय होईपर्यंत बुकिंग ठेवले जाणार बंदच 
  • 30 एप्रिलपर्यंत प्रवासी रेल्वे वाहतूक राहणार बंद : पार्सल रेल्वेसेवेवर भर 

सोलापूर : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन 14 एप्रिलनंतर टप्प्याटप्प्याने रेल्वे सेवा सुरु होईल, या आशेने रेल्वे मंत्रालयाने ठरावीक मार्गांवरील प्रवाशांचे ऑनलाइन बुकिंग घेतले. अनेक प्रवाशांनी तिकीट बुकिंगही केले, मात्र आता लॉकडाउन 30 एप्रिलपर्यंत वाढल्याने बुकिंग केलेल्या सर्वच प्रवाशांना तिकीटाचा 100 टक्‍के परतावा देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने नुकताच घेतला आहे. 

हेही नक्‍की वाचा : मोठा निर्णय ! महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची घरबसल्या होणार ऑनलाइन परीक्षा 

 

पश्‍चिम रेल्वेच्या सोलापूर विभागातील सिध्देश्‍वर एक्‍स्प्रेस आणि इंटरसिटी यासह उद्यान एक्‍स्प्रेस अशा रेल्वे गाड्यांचे ऑनलाइन बुकिंग हाउसफूल्ल झाले होते. तत्पूर्वी, लॉकडाउन वाढल्यास तिकीट परतावा मिळेल, अशा ऑनलाइन सूचनाही प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, गावाकडे अथवा कामाच्या ठिकाणी जाण्याच्या निमित्ताने प्रवाशांनी तिकीट बुकिंग केली होती. दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय जाहीर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करुन हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता रेल्वेची प्रवासी सेवा 30 एप्रिलपर्यंत बंदच राहणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. आता प्रवाशांनी ऑनलाइन तिकीट रद्द करुन घ्यावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

हेही नक्‍की वाचा : मोठी ब्रेकिंग ! दहावीच्या भुगोल विषयाचा ठरला निर्णय 

13 लाख कर्मचारी अन्‌ दररोज बाराशे कोटींचा फटका 
रेल्वे विभागात तब्बल 13 लाख 87 हजारांपर्यंत अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या वेतनापोटी रेल्वेला दरवर्षी अकराशे कोटी रुपये दरमहा मोजावे लागतात. तत्पूर्वी, दरमहा रेल्वेला सरासरी बाराशे कोटींपर्यंत उत्पन्न मिळते. मात्र, 22 मार्चपासून पार्सल अन्‌ जीवनाश्‍यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या काही रेल्वे गाड्या वगळता देशातील संपूर्ण रेल्वेसेवा बंदच आहे. त्यामुळे उत्पन्न काहीच नाही परंतु, अधिकारी अन्‌ कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी रेल्वे विभागाला सुमारे दीड हजार कोटी रुपये मोजावे लागतील, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. 

हेही नक्‍की वाचा : सुखद बातमी ! कोरोना हद्दपार होण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पत्नी सरसावल्या 

रेल्वे बोर्डाच्या बैठकीत ठरेल निर्णय 
कें
द्र सरकारशी चर्चा करुन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाउन 30 एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 14 एप्रिलनंतर ऑनलाइन बुकिंग केलेल्यांना तिकीटाचा 100 टक्‍के परतावा दिला जाईल. दरम्यान, रेल्वे बोर्डाची बैठक सुरु असून त्यांच्याकडून निर्णय अपेक्षित असल्याचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदिप हिरडे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Train passengers will get 100% return