मोठी ब्रेकिंग : ! जूनपासून रेल्वे होणार सुरू; जिल्हाबंदीमुळे महाराष्ट्राअंतर्गत प्रवासासाठी मिळणार नाही तिकीट 

तात्या लांडगे
गुरुवार, 21 मे 2020

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जिल्हाबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणताही प्रवासी विनापरवानगी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ शकत नाही. या पार्श्‍वभूमीवर 1 जूनपासून दररोज 200 रेल्वे सुरू झाल्या तरीही महाराष्ट्रअंतर्गत प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना तिकीट दिले जाणार नाही. महाराष्ट्रातून परराज्यात जाणाऱ्या अथवा अथवा परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांनाच तिकीट दिले जाणार आहे. 

हेही वाचा : 

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जिल्हाबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणताही प्रवासी विनापरवानगी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ शकत नाही. या पार्श्‍वभूमीवर 1 जूनपासून दररोज 200 रेल्वे सुरू झाल्या तरीही महाराष्ट्रअंतर्गत प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना तिकीट दिले जाणार नाही. महाराष्ट्रातून परराज्यात जाणाऱ्या अथवा अथवा परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांनाच तिकीट दिले जाणार आहे. 

हेही वाचा : शासन लागलंय द्यायला, उद्योजकांकडे पदर नाही घ्यायला 

सर्व विशेष गाड्यांचे बुकिंग आधीच 
1 जूनपासून सुरू होणाऱ्या सर्व विशेष गाड्यांचे बुकिंग आधीच आयआरसीटीसी वेबसाइट www.irctc.co.in व मोबाईल ऍपद्वारे 30 दिवसांत एआरपी (आगाऊ आरक्षण कालावधी)नुसार ऑनलाइन सुरू राहणार आहे. कोणत्याही रेल्वे स्थानकावरील आरक्षण काऊंटरवर तिकिटे आरक्षित केली जाणार नाहीत. एजंट (आयआरसीटीसी एजंट आणि रेल्वे एजंट दोघे) यांच्यामार्फत तिकीट बुक करण्यास परवानगी नाही. या वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित दोन्ही वर्ग असलेल्या विशेष गाड्या पूर्णपणे राखीव गाड्या असतील. 

हेही वाचा : धक्कादायक ! उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यानेच लॉजवर केला मद्यसाठा 

सर्व प्रवाशांना जागा देण्यात येईल 
सामान्य द्वितीय श्रेणी (जीएस) डब्ब्यातही बसण्यासाठी राखीव जागा असेल. भाडे सामान्य असेल आणि सामान्य द्वितीय श्रेणी (जीएस) डब्ब्यांसाठी राखीव असल्यास, द्वितीय आसन (2 एस) श्रेणीचे भाडे आकारले जाईल आणि सर्व प्रवाशांना जागा देण्यात येईल. अस्तित्वात असलेल्या नियमांनुसार आरएसी आणि प्रतीक्षा यादी तयार केली जाईल परंतु प्रतीक्षा यादीतील तिकीट धारकांना ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 

केंद्रीय रेल्वे बोर्डाचे नवे परिपत्रक 
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने 1 जूनपासून 200 गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गाड्यांची यादी जाहीर करण्यात आली असून सोलापूर स्थानकावरून उद्यान, गदग, कोणार्क आणि हुसेनसागर एक्‍स्प्रेसचा समावेश आहे. मात्र, या गाड्यांचे थांबे निश्‍चित झाले नसून त्याची यादी लवकरच येईल. दरम्यान, महाराष्ट्रात जिल्हाबंदी असल्याने राज्यांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे तिकीट मिळणार नाही. तर परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या अथवा महाराष्ट्रातून परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांनाच रेल्वे तिकीट दिले जाणार आहे. हा निर्णय केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादित असेल. 
- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर रेल्वे 

            रेल्वे प्रवाशांसाठी अशा आहेत सूचना 

  • - सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात येईल आणि केवळ लक्षणं नसलेल्या प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवेश करण्यास / बसण्यास राहणार परवानगी 
  • - केवळ पुष्टीकृत (confirmed) तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात दिला जाणार प्रवेश 
  • - सर्व प्रवाशांनी प्रवेशावेळी आणि प्रवासादरम्यान चेहऱ्यावर घालावी कव्हर / मुखपट्टी 
  • - स्टेशनवर थर्मल स्क्रीनिंग सुलभ करण्यासाठी प्रवाशांनी 90 मिनिटे अगोदर यावे स्टेशनवर 
  • - प्रवाशांनी स्टेशनवर आणि ट्रेनमध्ये सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक 
  • - गतंव्य स्थानावर आगमन झाल्यानंतर, प्रवाशांना संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेशांनी सूचित केलेल्या आरोग्य प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The train will start from June