करमाळा तालुक्‍यातील पोफळज येथील  माळढोक अभयारण्यात झाडांची कत्तल 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

पोफळज शिवारात रस्त्याच्या लगतच हे वनराईचे क्षेत्र असून सध्या झालेल्या पावसामुळे सर्वत्र हिरवीगार वनराई निर्माण झाली आहे. हे अभयारण्य या परिसरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे. वनविभागाच्या वतीने यापरिसरात वक्षतोडच नाहीतर गुरे चराई, ध्वनिप्रदूषण करण्यावरच नाहीतर संध्याकाळी सूर्यास्तानंतर सूर्योदयापर्यंत या परिसरात लोकांच्या वावरासही बंदी असल्याचा फलक पुणे वनविभाग वन्यपरिक्षेत्र वन्यजिव करमाळा यांनी लावलेला आहे, असे असताना वनराईतील झाडांची मशीनच्या साह्याने कत्तल केली गेली आहे. 

चिखलठाण : करमाळा तालुक्‍यातील पोफळज येथील वन विभागाच्या माळढोक पक्षी अभयारण्यातील वेताळ वनराईतील झाडांची मशीनच्या साह्याने मोठ्या प्रमाणावर तोड करण्ययात आली आसून या परिसरातील वनप्रेमीं मंडळींकडून सदर प्रकरणाची चौकशी करून बेकायदेशीर वक्षतोड करणारांवर कारवाही करण्याची मागणी केली जात आहे. 

करमाळा तालुक्‍यात माळढोक पक्षाचे आस्तित्व सध्या नसले तरी तालुक्‍यातील शेकडो एकर क्षेत्र माळढोक पक्षी आभयअरण्य म्हणून राखीव ठेवलेले आहे यापैकी कुंभेजफाटा ते पारेवाडी रस्त्यावर पोफळज शिवारात रस्त्याच्या लगतच हे वनराईचे क्षेत्र असून सध्या झालेल्या पावसामुळे सर्वत्र हिरवीगार वनराई निर्माण झाली आहे. हे अभयारण्य या परिसरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे. वनविभागाच्या वतीने यापरिसरात वक्षतोडच नाहीतर गुरे चराई, ध्वनिप्रदूषण करण्यावरच नाहीतर संध्याकाळी सूर्यास्तानंतर सूर्योदयापर्यंत या परिसरात लोकांच्या वावरासही बंदी असल्याचा फलक पुणे वनविभाग वन्यपरिक्षेत्र वन्यजिव करमाळा यांनी लावलेला आहे, असे असताना वनराईतील झाडांची मशीनच्या साह्याने कत्तल केली गेली आहे. 

या प्रकरणाची चौकशी करून ही बेकायदेशीर वक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वन्यप्रेमी व ग्रामंस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. 

संपादन : अरविंद मोटे 

महराष्ट्र सोलापूर करमाळा वनविभाग माळढोक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tree felling at Maldhok Sanctuary at Pophalaj in Karmala taluka