सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत जिल्ह्यात 32.52 टक्के मतदान; सर्वाधिक मतदान पंढरपुरात 34.43 टक्के 

प्रदीप बोरावके 
Friday, 15 January 2021

सोलापूर जिल्ह्यातील 590 ग्रामपंचायतींसाठी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत सरासरी 32.52 टक्के मतदान झाले आहे. पंढरपूर तालुक्‍यात सर्वाधिक 34.43 टक्के मतदान झाले आहे. 

माळीनगर (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील 590 ग्रामपंचायतींसाठी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत सरासरी 32.52 टक्के मतदान झाले आहे. पंढरपूर तालुक्‍यात सर्वाधिक 34.43 टक्के मतदान झाले आहे. 

जिल्ह्यातील 642 ग्रामपंचायतींसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदानास प्रारंभ झाला. जिल्ह्यातील 642 ग्रामपंचायतींसाठी सहा लाख 20 हजार 223 स्त्री मतदार व सहा लाख 63 हजार 196 पुरुष मतदार व इतर 17 असे मिळून एकूण 12 लाख 86 हजार 431 मतदार आहेत. पहिल्या दोन तासात जिल्ह्यात 12.54 टक्के मतदान झाले होते. या पहिल्या टप्प्यात मतदानाचा वेग संथ असल्याचे आकडेवारीवरून दिसते. मात्र, दुसऱ्या दोन तासांच्या टप्प्यात मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत जिल्ह्यातील दोन लाख 149 स्त्री, दोन लाख 18 हजार 231 पुरुष व इतर दोन अशा एकूण चार लाख 18 हजार 382 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. 

साडेअकरा वाजेपर्यंत तालुकानिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी : करमाळा 31.34, माढा 30.67, बार्शी 31.30, उत्तर सोलापूर 33.73, मोहोळ 33.59, पंढरपूर 34.43, माळशिरस 30.83, सांगोला 34.11, मंगळवेढा 30.89, दक्षिण सोलापूर 33.63, अक्कलकोट 31.36 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The turnout in Solapur district was 32 percent till eleven am