तांडव वेबसिरीजवरून भडकले ट्विटरयुध्द : समर्थक व विरोधकांच्या जोरदार प्रतिक्रिया 

अनुराग सुतकर
Tuesday, 19 January 2021

आता तर सर्वच सोशल मिडियावर वेबसिरीज पाहण्याचे आणि त्यातील दाखविलेल्या पडद्यावरील गोष्टींसाठी वास्तववादी आयुष्यात विनाकारण संघर्ष करण्याचे स्तोम माजत आहे. सध्या चर्चा आहे ती अली अब्बास झफर दिग्दर्शित " तांडव " या वेबसिरीजचं. त्या वेबसिरीजमध्ये भारतातील वास्तव परिस्थिती मांडली आहे असे काहींचे म्हणणे आहे. तर काही तरूणांनी त्यामध्ये देवीदेवतांचा अपमान करण्यात आला असल्याचे मत मांडत आहेत. 
 

सोलापूरः सोशल मिडियावर सध्या गाजत असलेल्या तांडव या वेबसिरीजच्या प्रेक्षकांकडून समर्थन व विरोधासाठी लाखो ट्‌विटचा मारा सूरु झाला आहे. त्यामुळे या वेबसिरीजच्या प्रेक्षकांची संख्या देखील वाढली आहे. 
आता तर सर्वच सोशल मिडियावर वेबसिरीज पाहण्याचे आणि त्यातील दाखविलेल्या पडद्यावरील गोष्टींसाठी वास्तववादी आयुष्यात विनाकारण संघर्ष करण्याचे स्तोम माजत आहे. सध्या चर्चा आहे ती अली अब्बास झफर दिग्दर्शित " तांडव " या वेबसिरीजचं. त्या वेबसिरीजमध्ये भारतातील वास्तव परिस्थिती मांडली आहे असे काहींचे म्हणणे आहे. तर काही तरूणांनी त्यामध्ये देवीदेवतांचा अपमान करण्यात आला असल्याचे मत मांडत आहेत. 
या वेबसिरीजवरून परस्परविरोधी मते ट्विटर सारख्या सोशल मिडियावर मांडली जात आहेत. यावरून जोरदार ट्विटरयुध्द सुरू झाले आहे. त्यामध्ये बॅन तांडव नाऊ, बॉयकॉट तांडव, नो बॅन टू तांडव असे' ट्विट टाकले जात आहेत. ऑफलाईन व ऑनलाईन या दोन्ही पध्दतीने ही मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या भरपूरच आहे. प्रेक्षकांची संख्या वाढल्याने ट्विटरयुध्द वाढले आहे. ही मालिका चार ते पाच तासाची आहे. या मालिकेच एकूण नऊ भाग आहेत. या ट्विटरयुध्दात एक लाखापेक्षा अधिक ट्‌विट आतापर्यंत प्रेक्षकांनी केले आहेत. त्यामुळे या वेबसिरीजची लोकप्रियता वाढली आहे. समाजातील तरूणांमधील शांतता भंग करण्यासाठी अशा अनेक गोष्टी सोशल किंवा ओटिटि मिडियावर नेहमी निर्माण होत असतात. अशा वेबसिरीज किंवा सिनेमांमुळे दिग्दर्शकांना अर्थिक फायदा तर मिळतोच शिवाय एक रूपया हि खर्च न करता चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. 

तेढ निर्माण करणाऱ्या वेबसिरीज नकोत 
वेबसिरीज या लोकांना चांगला दृष्टिकोन देणाऱ्या आणि चांगली दिशा दाखवणाऱ्या असाव्यात. शक्‍य होईल तीतके आक्षेपहार्य सिन्स टाळले पाहिजेत, जेणेकरून दोन समाजात सामाजिक तेढ निर्माण होणार नाही. अशा चुका होऊ नयेत यासाठी काहीतरी यंत्रणा असायला हवी. 
- पुजा वाकसे, 

सामाजिक संदेश योग्य असावा 
वेबसिरीज बघायला नको या मताचा मी नाही परंतु ज्यामुळे समाजातील कोणत्याही तरूणांमध्ये अस्थिरता निर्माण होईल असे बघणे आपण स्वताहून टाळले पाहिजेत.एकातर वेबसिरीजमध्ये चक्क फसवणूकीच्या गुन्हेगाराला हिरो बनविण्यात आले. त्यामुळे मुले ते पाहून अनुकरण करण्याच्या नादात सायबर क्राईम, मारामारी यांसारखे गुन्हे करतात. 
- ऍड. मंजुनाथ कक्कळमेल्ली,  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twitter war erupts from Tandav webseries: strong reaction from supporters and opponents