कोरोनाच्या जागृतीसाठी केले तब्बल अडीच लाख कॉल 

two and a half million calls were made for Coronas awakening
two and a half million calls were made for Coronas awakening
Updated on

पंढरपूर (जि. सोलापूर), ता. 22 : कोरोनाच्या संदर्भात देशातील अनेक नागरिक आजही गैरसमज व भीतीने ग्रासलेले आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन व अचूक माहितीची गरज आहे. हीच गरज ओळखून पंढरपुरातील प्रसिद्ध डीव्हीपी उद्योग समुहाचे प्रमूख व तरुण उद्योजक अभिजीत पाटील यांनी पंढरपूर तालुक्‍यातील तब्बल अडीच लाख लोकांना व्हाईसकॉल करत कोरोनाबद्दल मौलिक सल्ला दिला आहे. 
श्री. पाटील यांनी या कॉलच्या माध्यमातून शासनाच्या नियम व सुचनांचे पालन करा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, मस्कचा वापर करा अशी मौलिक माहिती दिली जात आहे. एकीकडे अत्यावश्‍यक सेवेतील लोकांसाठी दररोज मोफत जेवण या समुहाकडून सुरू असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाखांची मदतही समुहाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यातच अजून पुढचे पाऊल टाकत या समुहाचे प्रमुख अभिजीत पाटील यांनी पंढरपूर तालुक्‍यात अडीच लाख व्हाईस कॉल करत आपले योगदान सुरूच ठेवले आहेत. पंढरपूर तालुक्‍यातील जनतेनेही योग्य ती खबरदारी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी न जाता स्वतःला व कुटुंबातील लोकांना सुरक्षित ठेवावे व शासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Semi-Constructed Water Tank Poses Severe Threat to Students
Solapur Hotgi Lake IT Park Project To Get 35 Acres Land As 12 Acres Will Be Reserved For Infrastructure Facilities
Railway Project
Solapur ZP School
Marathi News Esakal
www.esakal.com