वेळेत उपचार न घेणाऱ्या दोघांचा मृत्यू ! शहरात आज 'या' ठिकाणी आढळले 29 रुग्ण

तात्या लांडगे
Saturday, 27 February 2021

51 वर्षांवरील दोन पुरुषांचा मृत्यू 
अरविंदधाम परिसरातील 51 वर्षीय पुरुषाला श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर 19 फेब्रुवारीला त्यांना उपचारासाठी शहरातील सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा 26 फेब्रुवारीला मृत्यू झाला. दुसरीकडे सिंधू विहार (विजयपूर रोड) येथील 62 वर्षीय पुरुषाला उपचारासाठी 21 फेब्रुवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, विलंबाने दाखल झाल्याने त्यांचाही उपचारादरम्यानच मृत्यू झाल्याचे महापालिकेच्या अहवालातून स्पष्ट होते. 

सोलापूर : शहरात आज 613 संशयितांमध्ये 29 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. रॅपिड ऍन्टीजेन टेस्टमध्ये 20 तर आरटीपीसीआर टेस्टमध्ये नऊजणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. शहरातील एकूण रुग्णसंख्या आता 12 हजार 387 झाली असून त्यातील 656 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

51 वर्षांवरील दोन पुरुषांचा मृत्यू 
अरविंदधाम परिसरातील 51 वर्षीय पुरुषाला श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर 19 फेब्रुवारीला त्यांना उपचारासाठी शहरातील सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा 26 फेब्रुवारीला मृत्यू झाला. दुसरीकडे सिंधू विहार (विजयपूर रोड) येथील 62 वर्षीय पुरुषाला उपचारासाठी 21 फेब्रुवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, विलंबाने दाखल झाल्याने त्यांचाही उपचारादरम्यानच मृत्यू झाल्याचे महापालिकेच्या अहवालातून स्पष्ट होते. 

आतापर्यंत शहरातील एक लाख 73 हजार 534 संशयितांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. शहराची लोकसंख्या 12 लाखांहून अधिक असतानाही मागील 10 महिन्यांत 20 टक्‍केदेखील टेस्ट झाल्या नाहीत, हे विशेष. कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाही टेस्टिंग वाढलेले नाही. शहरातील एकूण रुग्णांपैकी 11 लाख 278 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या 453 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. शहरात आज मेहता रेसिडेन्सी, जवान नगर, कोणार्क नगर (विजयपूर रोड), साहील नगर, जुना कुंभारी नाका (कुमठा नाका), शामा अपार्टमेंट (रेल्वे लाईन), पंकज हौसिंग सोसायटी (गुरुनानक नगर), भैय्या चौक (रेल्वे लाईन), लक्ष्मी नगर (जुळे सोलापूर), साठे चाळ (एसटी स्टॅण्डजवळ), पाटील नगर (सैफूल), दक्षिण कसबा (चौपाड), नागणे-देशमुख अपार्टमेंट (बुधवार पेठ), महालिंगेश्‍वर नगर (मजरेवाडी), जुना विडी घरकूल, हत्तुरे वस्ती, अंत्रोळीकर नगर, शेळगी गावठाण, विद्यासागर अपार्टमेंट (वसंत विहार), सिध्देश्‍वर पेठ आणि रेल्वे लाईन येथे नवे रुग्ण आढळले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two die without treatment in time! 29 patients were found in '22' places in the solapur city today