
सोलापूर : महापालिकेतील उच्चपदस्थ पदाधिकारी व अधिकारी कोरोनामुक्त होऊन येत असतानाच आणखी दोन अधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
महापालिकेच्या संगणक विभाग आणि पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्याचा समावेश कोरोनाग्रस्तामध्ये आहे. या अधिकाऱ्यांकडे संक्रमणग्रस्त परिसराची पाहणी करणे तसेच त्याचा अहवाल करण्याची जबाबदारी होती. कर्तव्य बजावत असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तपासणीसाठी त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता, तो आज शनिवारी पॅाझीटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यापूर्वी महापालिकेतील सुमारे चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना तर आठ ते दहा कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी काहीजण उपचारानंतर घरी परतले आहेत, तर काहीजणांवर अद्याप उपचार सुरु आहेत. महापालिकेतील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोरोना भागात फिरणे, संक्रमित नागरीक असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांची माहिती घेणे याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे संसर्गातून कोरोनाची लागण होत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
चिंताजनक...! शुक्रवारी एकाच दिवसात १०१ कोरोना बाधित
महापालिका हद्दीत काल शुक्रवारी एका दिवसात शंभरी पार केली. एका दिवसांत तब्बल १०१ जणांना कोरोनाची बाधा झाली. तर चारजणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या १५०२ वर पोचली आहे.
शहरातील विनायकनगर, रविवार पेठ, माणिक चौक, सुनीलनगर, न्यू बुधवार पेठ, लष्कर, शिवगंगानगर, यशनगर मुरारजी पेठ, सत्तर फूट रस्ता, संगमेश्वरनगर, अक्कलकोट रस्ता, कुमठा नाका, शासकीय निवासस्थान ई थ्री कुमठानाका, गांधीनगर, अनंत सोसायटी, माैलाली चौक, शोभा देवीनगर, रमांजली चौक, गुडलक हॅाटेल, गणेश बिल्डर, उमेशनगर, हनुमाननगर, समाधानगर, सह्याद्री पार्क, राजीव गांधीनगर भवानी पेठ, सुभाष नगर, मजरेवाडी, बेगम पेठ, स्वामी विवेकानंद नगर, भाग्यलक्ष्मीनगर, लक्ष्मी हौसिंग सोसायटी, जोडभावी पेठ, दत्त चौक, गोल्डफिंच पेठ, कर्णिकनगर, मुन्सिलपल कॅालनी, मल्लिकार्जुनगर, नरसिंग गिरजी चाळ, किसान संकुल, नियर शिवशक्ती हॅाटेल, फेस हाईटस, मंत्रीचंडकनगर भवानी पेठ, जेलरोड परिसर, तेलंगी पाच्छा पेठ, गुरुदत्त रेसिडन्सी, सुदर्शन हनुमाननगर, महादेवनगर, न्यू धोंडीबा वस्ती, रामवाडी, कुमार स्वामी नगर, मुस्लिम पाच्छा पेठ, मंत्रीचंडकनगर, व्यंकटेशनगर, मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, मुकुंदनगर, दाळगे प्लाॅट, दाजी पेठ, नामदेवनगर, गांधीनगर, पूर्व मंगळवार पेठ बाळीवेस, सिद्धेश्वनगर, होमकर नगर, भवानी पेठ, रोटे कॅाम्प्लेक्स, गुमटे निवास, विजयालक्ष्मीनगर भाग एक, भवानी पेठ, तोडकर वस्ती बाळे, भाग्य लक्ष्मीनगर मजरेवाडी, सम्राट चौक, आसरा हौसिंग सोसायटी, चंडकनगर सैफुल, हाजी हजरतखान चाळ, निराळ वस्ती, राठी चाळ, उत्तर कसबा, सोमाणी मंगल कार्यालयाजवळ, पाच्छा पेठ, शीख वस्ती भवानी पेठ, न्यू बुधवार पेठ, मड्डी भवानी वस्ती, कामाक्षीनगर शेळगी, जूना विजापूर नाका, टंकसाळनगर, नागेंद्रनगर, कुचननगर, संगमेश्वरनगर, गवळी वस्ती, लक्ष्मी पेठ, मराठा वस्ती भवानी पेठ, जय मल्हार चौक, शनिवार पेठ, डुमणेनगर, बी ग्रुप विडी घरकूल या परिसरात हे रुग्ण आढळून आले आहेत.
काल शुक्रवारी २५५ अहवालांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी -१५४ अहवाल निगेटिव्ह आले, तर १०१ अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत ०९ जण रुग्णालयातून बरे होऊन परत गेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.