चिनमधून सोलापुरात आलेल्या दोन व्यक्‍ती ठिकठाक 

chaina to solapur airport
chaina to solapur airport
Updated on

सोलापूर : चीनमधून करोना या विषाणूचा प्रसार सर्वत्र होऊ लागला आहे. सुरवातीला प्राण्यांपासून हा विषाणू मानवांमध्ये आला आणि आता मानवांमधून मानवांकडे त्याचा विस्तार होऊ लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात 'करोना'साठी स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, व्यवसायानिमित्त चिनमध्ये गेलेल्या सोलापुरातील दोन व्यक्‍ती काही दिवसांपूर्वी आल्या असून त्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती ठिकठाक असून त्यांच्याशी नियमित बोलणे सुरु आहे. 


केंद्र सरकारच्या निर्देशानुसार करोना बाधित देशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रिनिंग मुंबईसह देशातील सात विमानतळांवर सुरु करण्यात आले आहे. संशयित करोना आजारी रुग्णांना भरती करण्यासाठी सध्या मुंबईत कस्तुरबा रुग्णालय आणि पुण्यात नायडू रुग्णालयात विलगीकरण व उपचाराची सोय करण्यात आली आहे. करोना आजार प्रतिबंध व नियंत्रणासाठी आंतर विभागीय समन्वयाची अत्यंतिक आवश्‍यकता आहे. नागरी विमान वाहतूक विभाग, नगर विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभागांनी नियमित समन्वय साधून अहवाल सादर करावा, अशा सूचना आरोग्य मंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सद्यस्थितीत राज्यात करोना आजाराचे 12 संशयित रुग्ण आढळले असून पाच हजार 128 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. 


ठळक बाबी... 

  • करोना विषयक मार्गदर्शनासाठी 104 हा हेल्पलाइन क्रमांक 
  • करोना बाधित देशातून भारतातील शहरांमध्ये येणाऱ्यांची नियमित माहिती संकलित 
  • संबंधित प्रवाशांची पुढील 28 दिवसांपर्यंत दैनंदिन पाठपुरावा सुरु 
  • पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत रुग्णांच्या निदानाची व्यवस्था 
  • प्रत्येक जिल्ह्यात विलगीकरण व उपचार कक्ष सुरु करण्याचे निर्देश 


आज जिल्हाधिकारी घेणार बैठक 
चीनमधील वुहान शहरात नवीन करोना विषाणूचा उद्रेक घोषित करण्यात आला. त्यानंतर जपान, थायलंड, दक्षिण कोरीया, अमेरिकेसह अन्य 11 देशांमध्ये करोनाचे संशयित रुग्ण आढळले. हा आजार भारतात येऊ नये यासाठी आरोग्य विभागामार्फत दैनंदिन माहिती घेतली जात आहे. सोलापुरात सर्वोपचार रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात आला असून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या (रविवारी) बैठक घेतली जाणार आहे. 
- डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Congress spokesperson Hanumant Pawar criticizes BJP over Ram Mandir credit politics and 'Ladki Bahin' scheme policy
Marathi News Esakal
www.esakal.com