बरणीत तोंड अडकल्याने प्राण्यांच्या जीवावर बेतण्याचे प्रकार 

kutri photo.jpg
kutri photo.jpg

सोलापूर, ः शहरात अन्नाच्या वासाने बरणी व भांड्यात तोंड अडकून अनेक प्राण्यांना जीवाला मुकावे लागते. हे वाढते प्रकार लक्षात घेत अनेक भागात निसर्गप्रेमी व नागरिक सतर्कतेने प्राण्यांची सुटका करीत आहेत. 
सोलापूर शहरात फिरस्ती जनावरांची संख्या भरपूर प्रमाणात आहे. त्यामध्ये कुत्रे, गाई, बैल व खोंड हे दिसून येतात, या सर्व जनावरांची अन्नाची गरज ही कचराकुंड्यामधील अन्न व खाद्यावर तसेच लोकांनी टाकलेल्या वेगवेगळ्या गोष्टीतून भागते. पण बऱ्याच वेळा जे काही अन्नपदार्थ असतात ते प्लास्टिकच्या बरणीमध्ये असतात. या भांड्यातील अन्नपदार्थांच्या वासामुळे कुत्री त्यांची तोंड त्यामध्ये टाकतात. त्यामध्ये तोंड अडकल्याने ते संकटात सापडतात. पाण्याच्या शोधात फिरणाऱ्या जनावरांचे कुत्र्यांचे तोंड हे घागरी मध्ये अडकते आणि त्यानंतर त्यांना त्यातून तोंड बाहेर काढता येत नाही. 
अनेक वेळा नागरिक बरणी किंवा घागर फोडुन जनावरांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करतात. परंतु ज्या जनावरांना त्यातून सुटका केली जात नाही त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे जागरुक नागरिकांनी या प्रकारच्या घटनामध्ये प्राण्यांची सुटका तत्काळ करणे आवश्‍यक आहे. बरणी किंवा भांड्यात तोंड अडकल्याने अनेक वेळा बरणी ऑक्‍सिजन कमी पडून श्‍वास गुदमरल्याने प्राण्यांचा मृत्यू होतो. 
प्राणी संरक्षणात काम करणाऱ्या संस्थाच्या कार्यकर्त्यांनी अनेक जनावरांचे प्राण या परिस्थितीत वाचवले आहेत. आपल्या शहरातील अशा अनेक कुत्र्याचे तोंड प्लास्टिक बरणीत अडकून बसलेले आढळून येते. आपण सर्वांनी ठरवले की कोणती ही प्लास्टिकची बरणी फेकून देत असताना ती प्लास्टिकची बरणी किंवा घागर पुर्णपणे तोडून नष्ट करावी. जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडू नये. हे प्रकार जवळपासच्या परिसरात आढळल्यास नागरिकांनी स्वतःच या प्राण्यांची सुटका करावी. प्लास्टिकची बरणी किंवा घागर पूर्णपणे नष्ट करावी. 

55 प्राण्यांची सुटका
आतापर्यंत संस्थेच्या वतीने 55 प्राण्यांची सुटका केली आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगून अशी प्रकारची भांडी फोडून प्राण्यांची सुटका करावी. 
- डॉ. आकाश जाधव, ऍनिमल राहत सोलापूर  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com