सरकार चालवायला दम लागतो, तो उद्धव ठाकरे यांच्यात नाही ! फडणवीस यांनी लगावला टोला 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 October 2020

श्री.फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने नेहमीच महाराष्ट्राला मदत केली आहे. आता लोकांना मदतीची गरज आहे आशा वेळी केंद्राकडे मदतीकडे बोट दाखवण्याऐवजी त्यांनी हिम्मत असेल तर शेतकऱ्यांना मदत करावी. केंद्र सरकारने कर्ज काढून राज्याच्या जीएसटीचे पैसे दिले आहेत, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आरोपाचे ही त्यांनी खंडन केले.

पंढरपूर (जि. सोलापूर): मुख्यमंत्री उध्दव ठाकरे थिल्लर आहेत. सरकार चालवयाला दम लागतो तो त्यांच्यात नाही असा सणसणीत टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आज लगावला. 

अतिवृष्टी आणि महापूरामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी फडणवीस आज सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि करमाळा तालुक्‍याच्या दौऱ्यावर आले होते. पाहणी दरम्यान त्यांनी गार अकोला (ता.माढा) येथे पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर चौफेर हल्ला चढवला. 

श्री.फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने नेहमीच महाराष्ट्राला मदत केली आहे. आता लोकांना मदतीची गरज आहे आशा वेळी केंद्राकडे मदतीकडे बोट दाखवण्याऐवजी त्यांनी हिम्मत असेल तर शेतकऱ्यांना मदत करावी. केंद्र सरकारने कर्ज काढून राज्याच्या जीएसटीचे पैसे दिले आहेत, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आरोपाचे ही त्यांनी खंडन केले. राज्यावर 50 हजार कोटी कर्ज घेतले आहेत. आणखी 70 हजार कोटी काढण्याची राज्याकडे क्षमता आहे, असे सांगत कर्ज काढा पण शेतकऱ्यांना मदत करा, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

आम्ही शेतकऱ्यांना केंद्राच्या मदतीची वाट न बघता शेतकऱ्यांना 10 हजार कोटीची मदत केली होती. आता केंद्राची वाट का ? बघता असा सवाल उपस्थित करत उपमुख्यमंत्री अजित पवार दिशाभूल करत असल्याचा आरोप ही त्यांनी केला. यावेळी खासदार जयसिध्देश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, रणजितसिंह मोहिते पाटील, प्रशांत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, चेतन केदार, राजाभाऊ जगदाळे आदी उपस्थित होते. 

संपादन : अरविंद मोटे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray does not have the ability to run the government: Devendra Fadnavis