पाच दिवसाआड मिळणार पाणी
शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी तीन ठिकाणी गळत आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी 24 तासांहून अधिक कालावधी लागणार आहे. त्यामुळे आगामी एक रोटेशन पाच दिवसाआड होणार आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करावा, अपव्यय टाळावा, असे नेहमीप्रमाणे आवाहन महापालिकेने केले आहे. नियमित तथा एक दिवसाआडही पाणी मिळत नाही. आता चार- पाच दिवसआड पाणी पुरवठा करुनही पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन केल्याने आश्यर्च व्यक्त होत आहे. दरम्यान, हद्दवाढ भागातील काही नगरांमध्ये खरे तर अगोदरपासूनच पाच- सहा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. या विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे आणि जलवाहिनीच्या गळतीमुळे तेथील नागरिकांना पाण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.
सोलापूर : उजनी ते सोलापूर जलवाहिनीला केगाव येथील एमआयटी कॉलेज गेटजवळ, चंद्रमौळीजवळ आणि जय हनुमान हॉटेलजवळ (उजनी) याठिकाणी पाणी गळती मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. हजारो लिटर पाणी वाया जात असून मुख्य पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे उद्या (मंगळवारी) होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने, उशीरा व कमी वेळ होईल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
पाच दिवसाआड मिळणार पाणी
शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी तीन ठिकाणी गळत आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी 24 तासांहून अधिक कालावधी लागणार आहे. त्यामुळे आगामी एक रोटेशन पाच दिवसाआड होणार आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करावा, अपव्यय टाळावा, असे नेहमीप्रमाणे आवाहन महापालिकेने केले आहे. नियमित तथा एक दिवसाआडही पाणी मिळत नाही. आता चार- पाच दिवसआड पाणी पुरवठा करुनही पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन केल्याने आश्यर्च व्यक्त होत आहे. दरम्यान, हद्दवाढ भागातील काही नगरांमध्ये खरे तर अगोदरपासूनच पाच- सहा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. या विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे आणि जलवाहिनीच्या गळतीमुळे तेथील नागरिकांना पाण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.
शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन जुनाट झाल्याने वारंवार या जलवाहिनीला गळती होऊ लागली आहे. आता तीन ठिकाणी गळती होऊ लागली असून महापालिकेच्या वतीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी 18 ते 24 तासांचा वेळ लागणार असल्याने पुढील रोटेशन विस्कळीत होणार आहे. शहर व हद्दवाढ भागातील पाणी पुरवठा उशीराने, कमी वेळ व कमी दाबाने होईल, असे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे.