
सोलापूर : मुंबई, नवी मुंबईच्या पाठोपाठ रुग्ण संख्या झपाट्याने वाढण्यामध्ये पुण्याचा क्रमांक होता. पुण्यातील बहुतांशी भाग प्रतिबंधित करूनही कोरोना या विषाणूचा संसर्ग वाढत असल्याची चिंता प्रशासनाला लागली होती. दरम्यान, सोलापूरच्या दौर्यात विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांना भावल्या. त्यांनी लगेच पुण्याच्या पोलिस आयुक्तांना फोन केला आणि अशा प्रकारच्या योजना करण्याचे सुचवले. त्यानुसार पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्रात उपाययोजना केल्या आणि कोणाचा संसर्ग रोखण्यास मोठी मदत झाली.
सोलापुरातील पाच्छा पेठेत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील रुग्ण कुर्बान हुसेन नगरातही सापडला. त्यानंतर तो परिसर प्रतिबंधित करण्यात आला. कामगार वस्ती असलेल्या या भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदर बाजार पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळंके यांनी निराधारांना टोकन देऊन बँकेच्या इतर वेळेत पैसे मिळवून दिले. तसेच परिसरातील रेशन दुकानदारांना बोलावून एका ठिकाणी सोशल डिस्टन्स ठेवून नागरिकांना धान्य वाटप केले. त्यामुळे आता या परिसरातील धोरणाचा संसर्ग खंडित झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नगरसेवक बनले कोरोना वॉरियर्स
सोलापुरातील विविध भागांमध्ये पसरू लागलेल्या कोरोना हा विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी आता शहरातील काही नगरसेवकांनी कंबर कसली आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील चार ते दहा कुटुंबासाठी त्यांनी एक स्वयंसेवक नियुक्त केला आहे. त्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून संबंधित कुटुंबाच्या अडचणी त्यांच्या गरजा दररोज जाणून घेतल्या जात आहेत. त्यांनी घराबाहेर पडू नये, त्यांना लागणाऱ्या वस्तू घरपोच व्हाव्यात, यादृष्टीने नगरसेवकांनी नियोजन केले आहे. यंदा रमजान ईद निमित्तच्या इफ्तार पार्टी सोशल डिस्टन्स व योग्य खबरदारी घेऊन घरीच करण्याचा निश्चय विद्यमान नगरसेवकांसह माजी नगरसेवकांनीही केला आहे. त्यांच्या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून या कामाला पोलिस प्रशासनाने मोठे सहकार्य केले आहे. दरम्यान, कोरोना या विषाणूचा विळखा सोडविण्यासाठी म्हणून खऱ्या अर्थाने डॉक्टरांच्या जोडीला पोलीस अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत.
उत्कृष्ट कर्मचारी, अधिकाऱ्यांचा गौरव
काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होऊनही, ते तेवढ्याच जोमाने रस्त्यांवर पहारा देत आहेत. या कालावधीत उत्कृष्ट काम करणार्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा दररोज गौरव केला जात आहे. प्रत्येक अधिकारी व कर्मचारी नागरिकांची सुरक्षितता पाहत आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातील नियोजन उत्कृष्ट केले असून तेथील नागरिकांना घरपोच सेवा देण्यास प्राधान्य दिले आहे.
- अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.