नैसर्गिक रंगात रंगला श्रीरंग!

Various flowers in Vitthal Temple
Various flowers in Vitthal Temple
Updated on

पंढरपूर (सोलापूर) : आज वसंत पंचमी निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध आर्षक पान फुलांची सजावट करण्यात आली आहे. फुलांच्या सजावटीसाठी प्रथमच विविध रंगाच्या 20 फुलांचा वापर केला आहे. विविध फुलांच्या आकर्षक आणि मनमोहक रंगामध्ये सावळ्या विठुरायाचे रुप रंगून गेले आहे. आज वसंत पंचमी आणि विठ्ठल रुक्मिणीची शाही विवाह सोहळा ही होणार आहे. या विवाह सोहळयाच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा आणि मंदिर विविध फुलांनी सजवण्यात आले आहे. या नैसर्गिक रंगामध्ये विठुमाऊलचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.

सजावटीसाठी झेंडू, शेवंती, गुलाब, निशीगंध एथोरम, आरकेड, कामीनी, तगर, अष्टर, बिजली, ग्लॅडीओ, जरबेरा,ड्रेेसेना, तुळशी अशा 14 प्रकारच्या पाना फुलांची सजावट करण्यात आली आहे. यामध्ये विविध प्रकारच्या 20 पाना फुलांची रंग संगती करण्यात आली आहे. यामध्ये विठ्ठल रुक्मिणीचा गाभार्यात अशा फुलांची खास सजावट कऱण्यात आली आहे. याबरोबरच मंदिरातील प्रवेशद्वार, सोळखांबी, सभामंडप या ठिकाणी फुलांची सजावट करण्यात आली आहे. फुलांच्या सावटीने देवाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे. पुणे येथील भाविक दिलीप भुजबळ यांच्या वतीने ही आरास करण्यात आली आहे. लक्ष्मी फ्लाॅवर्स यांच्या 50 कलाकारांनी ही रात्रीतून फुलांची सावट केली आहे. सजावटीसाठी सुमारे 2 हजार फुलांचा वापर केला आहे. तर पुणे येथील संतोष आढागळे यांनी सभामंडपात आकर्षक रांगोळी काढली आहे. आज सायंकाळी देवाची शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभा यात्रेत मुळशी येथील नरसिंह तरुण मंडळा ढोल व झांड पथक सहभागी होणार आहे. वसंत पंचमीच्या निमित्ताने दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Congress spokesperson Hanumant Pawar criticizes BJP over Ram Mandir credit politics and 'Ladki Bahin' scheme policy
Marathi News Esakal
www.esakal.com