पाच लाखाचा दोडका जनावरांना खाउ घालण्याची वेळ

CKL20A00769_pr.jpg
CKL20A00769_pr.jpg

चिखलठाण (सोलापूर), ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतात पिकलेला भाजीपाला विकला जात नसल्याने शेटफळ (ता.करमाळा) येथील शेतकऱ्यावर आपल्या शेतातील दोडका जनावरांना खाऊ घालण्याची वेळ आली आहे. 

सध्या कोरोणा संसर्गाच्या पासून वाचण्यासाठी सर्वत्र लॉंक डाऊन स्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मोठ्या कष्टाने पिकवलेली पिके मागणीअभावी तशीच शेतात पडून खराब होऊ लागली आहेत. शेटफळ येथील शेतकरी विकास गुंड यांनी आपल्या शेतात दोन एकर क्षेत्रावर दोडका पिकाची लागवड केली होती. 
दोन एकर दोडक्‍याचे पिक उभे करण्यासाठी त्यांनी आजपर्यंत बियाणे, खते,मल्चिंग,खुरपणी, मशागत,व इतर साहित्य यासाठी मोठा रुपये खर्च झाला. नुकताच दोडका मार्केटला विक्रीसाठी पाठवण्याच्या काळातच लोक डाऊन सुरू झाल्याने सुरवातीच्या तीस कॅंरेटचे फक्त दोन हजार रूपये आले. एवढा मोठा खर्च करून देखील मालच बाजारात नेता आला नाही. त्यामुळे त्यांना मोठा आर्थीक फटका बसला आहे.

नाईलाजाने त्यांनी हाती आलेले दोडके जनावराला खाण्यासाठी टाकून दिले. 
स्थानिक बाजारात त्याला मागणी नाही. शहरात विक्रीसाठी नेता येत नाही. स्थानिक व्यापारी मातीमोल दराने मागत असल्यामुळे पिके शेतातच खराब होऊन नासू लागली आहेत. शेतातील या काढणीयोग्य पिकाच्या खरेदीची व्यवस्था शासनाने करावी अथवा सर्व पिकांचे पंचनामे होऊन शासनाकडून भरपाई मिळण्याची मागणी ही शेतकऱ्यांमधून केली जात आहे. लॅाकडाऊनमध्ये शेतकर्याचा माल पिकला तरी वाहतूकीची परवानगी मिळत नाही. परवानगी घेतली तर बाजारात व्यापारी ग्राहक नसल्याने भाव पाडून मागतात. अशा स्थीतीत शेतमालाला भाव मिळत नाही. उत्पादन खर्च न निघाल्याने भाजी पाला उत्पादक अडचणीत सापडला आहे. भाजीपाला व फळे हे नाशवंत असल्याने त्याला तातडीने बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक होते पण ते झाले नाही. 

पाच लाखाचे उत्पन्नाचे झाले नुकसान
माझ्या दोन एकर क्षेत्रावर दोडक्‍याचे पिकासाठी आजपर्यंत एक लाख वीस हजार रुपये खर्च केला. एकूण अठरा टन माल निघून पाच लाख रुपयापर्यंत उत्पन्न अपेक्षित होते माल सुरू होताच लॉक डाऊन सुरु झाले. लवकरच परिस्थिती सुरळीत होईल म्हणून माल तोडला नाही.  सध्याच्या परिस्थितीत मालच विकत नसल्याने मोठे अर्थिक नुकसान झाले आहे.- विकास गुंड, शेतकरी शेटफळ (ता.करमाळा) 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com