
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसांदिवस वाढत आहे. त्याला रोखण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. मृत्यूचे प्रमाणही वाढत असून अनेक रुग्ण शेवटच्या टप्प्याप रुग्णालयात येत असल्याचे प्रशासन सांगत आहे. यातून नागरिकांमध्ये जागृती व्हावी म्हणून सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही आता जागृती केली जात आहे. यासाठी वेगवेगळे व्हिडीओ तयार केले असून व्हायरल केले जात आहेत.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसांदिवस वाढत आहे. त्याला रोखण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. मृत्यूचे प्रमाणही वाढत असून अनेक रुग्ण शेवटच्या टप्प्याप रुग्णालयात येत असल्याचे प्रशासन सांगत आहे. यातून नागरिकांमध्ये जागृती व्हावी म्हणून सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही आता जागृती केली जात आहे. यासाठी वेगवेगळे व्हिडीओ तयार केले असून व्हायरल केले जात आहेत.
सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सोलापूर जिल्हा कोविड नियंत्रण कक्ष यांच्यावतीने जागृती केली जात आहे. जिल्ह्याच्या माहिती व जनसंपर्क कार्यालयाच्या फेसबुकवरुन जागृती करणारे संदेश व्हायरल करण्यावर भर दिला जाऊ लागला आहे. दैनदिन व्यहवारातील चलनी नोटांमुळे कोरोना प्रसार होत असल्याचे सामोर येत आहे. त्यामुळे कॅशलेस व्यहवार करण्यावर भर देण्याचे आवाहन केले जात आहे. नागरिकांनो चलनी नोटातून कोरोनाचा प्रादुर्भव वाढत असल्याचे निदर्शनास येत असून कॅशलेस व्यहवाराचा आग्रह धरा असे सांगितले जात आहे. यासाठी व्हिडीओ तयार केले आहे. कोरोना विषाणू आजाराने बाधीत किंवा संशयित गर्भवतींनी प्रसूतीच्या वेदना सुरु
झाल्यास लवकरात लवकर विशेष रुग्णालयास भेट द्यावी, इतर कोणत्याही रुग्णालयात जाणे टाळावे. रुग्णालयात जाण्यापूर्वी फोन द्वारे त्यांना माहिती द्यावी, रुग्णालयात पोचल्याबरोबर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड आजाराबद्दल माहिती द्यावी. त्यामुळे विलगीकरण कक्षात ठेवण्यास मदत होणार आहे. प्रसूतीदरम्यान योग्य काळजी घेतली जाणार आहे. ‘कोविड १९ विरुद्ध लढण्यासाठ तयार व्हा! बाळा, घाबरु नको! तुझ्या ‘उद्यासाठी’ आम्ही ‘आज’ सज्ज आहोत.’‘घाबरु नका... जागरुक रहा कोरोना बरा होतो. लवकर लक्षणे ओळखा, लवकर निदान करा, लवकर उपचार घ्या’, नियमीत वापरात येणाऱ्या वस्तूंचे निर्जुंकीकरण करा. उदा दरवाजाचे हँडल, चाव्या, कारच्या दरवाजाचचे हँडल, पायऱ्यांचे रेलिंग, लॅपटॉप, मोबाईल, पेन याबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदीक उपाय सांगण्यात आले आहेत. सोलापुरात बरे होऊन रुग्ण घरी गेले आहेत असे ही यामध्ये सांगण्यात आले आहे. घरातच बसून सरकारच्या सूचनांचे पालन करा, असे आवाहनही केले आहे. सामाजिक अंतर ठेवण्याची जागृती करण्यासाठी वेगवेगळे व्हिडीओ तयार केले आहेत. तोंडाला मास्क लावा, सॅनिटाझर वापरा असे आवाहन केले आहे.
कोरोना व्हायरसचा धोका कोणाला?
कोरोना विषाणूचा हृदयरोगी, ज्येष्ठ नागरिक, मधुमेह रुग्ण, उच्च रक्तदाब रुग्ण यांना जास्त धोका असल्याचे यामध्ये सांगण्यात आले असून त्यांची काळजी घ्या असं म्हटलं आहे. वेळीच उपचार घ्या, कोरोनापासून बचाव करा, ताप, कोरडा खोकला, श्वासनास त्रास होत असल्यास तत्काळ उपचार घेण्याचे आवाहनही यामध्ये करण्यात आले आहे.