सीमेबाहेरील डॉ. विकास आणि गुरवीन यांचे प्रेम

सुस्मिता वडतिले
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

दोघांचाही निर्णय असा होता की परिवाराच्या भावना दुखवून लग्न करायचे नाही. त्यासाठी दोघांनीही आपल्या परिवाराला समजाविण्याचा प्रयत्न केले. सुरवातीला दोघांच्याही घरच्यांनी लग्नाला होकार दिला नाही. त्यानंतर दोघांनीही परिवाराची एकमेकांना भेट घालून दिली.

सोलापूर : सोलापूरचे डॉ. विकास महालकर आणि लुधियानाच्या गुरवीन कौर संधू यांची सीमेबाहेर सुरू झालेली ही लव्हस्टोरी. डॉ. विकास यांनी 2014-15 मध्ये दिल्लीत यूपीएससीच्या मुख्य परीक्षेनंतर एका खासगी रुग्णालयात फिजिशियनची नोकरी स्वीकारली. त्यादरम्यान त्याच हॉस्पिटलमध्ये डायटीशियन म्हणून काम करत असलेल्या गुरवीन कौर संधू यांच्याबरोबर पहिली भेट झाली. पहिल्या भेटीचे रूपांतर हळूहळू मैत्रीत होत गेले. त्यानंतर 2017 मध्ये मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले अन्‌ त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. 
दोघांचाही निर्णय असा होता की परिवाराच्या भावना दुखवून लग्न करायचे नाही. त्यासाठी दोघांनीही आपल्या परिवाराला समजाविण्याचा प्रयत्न केले. सुरवातीला दोघांच्याही घरच्यांनी लग्नाला होकार दिला नाही. त्यानंतर दोघांनीही परिवाराची एकमेकांना भेट घालून दिली. त्यादरम्यान दोघांच्याही परिवारांना एकमेकांविषयी आपुलकी आणि चांगुलपणा जाणवला. त्यानंतर या लग्नाला दोन्ही परिवाराकडून खुशीने संमती मिळाली. नोव्हेंबर 2019 मध्ये त्यांचे दोन्ही परिवारांच्या संमतीने विवाह करून दिले. 
सध्या डॉ. विकास महालकर गोवा येथील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. डॉ. विकास आणि गुरवीन एकत्र आनंदाने गोवा येथे राहात आहेत. अशी ही यांची लव्हस्टोरी. डॉ. विकास आणि गुरवीन दोघे आजच्या यूथला असे आवाहन करू इच्छितात की, पहिले आपले शिक्षण व्यवस्थित पूर्ण करा. त्यानंतर नोकरी किंवा उद्योग करून सेटल व्हा आणि त्यानंतर लग्नाचा निर्णय घ्या. घाईगडबड न करता आपल्या परिवाराला विश्‍वासात घेऊन कोणतेही निर्णय घ्या आणि आपल्या रिलेशनशिपमध्ये आत्मीयता, सेल्फ रिस्पेक्‍ट आणि एकमेकांविषयीचा विश्‍वास राहूद्या तरच तुमचे रिलेशन आयुष्यभर टिकेल. व्हॅलेंटाइन डे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vikas and Gurwins love story