
सोलापूर : कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले आहे. त्याला रोखण्यासाठी सध्या लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून महाराष्ट्रात जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहेत. मात्र, आता सरकारने लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या कामगारांना योग्य ती प्रक्रिया करुन आपल्या मुळ जागी जाण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी एसटी बस व रेल्वही उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे बाहेरगावचे नागरिक आपल्या गावी परतू लागले आहेत. मात्र याची धास्ती गावातील नागरिकांनी घेतली आहे. गावात आल्यानंतर खबरदारी म्हणून कशी काळजी घ्यायची, याच्या सूचना दिल्या जात आहेत.
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसांदिवस वाढत आहे. सरकारने परवानगी दिल्याने पुणे, मुंबईसह इतर ठिकाणूहून काही नागरिक आपल्या मुळगावी येत आहेत. यातूनच त्यांनी काय काळजी घ्यायची याच्या सूचना गावातील व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून दिली जात आहे. ‘मुळ गावी येणाऱ्या नागरीकांनी खालील गोष्टी पाळायलाच हव्यात, म्हणून करोना व्हायरसचा प्रसार नक्कीच थांबेल’, असं त्यात म्हटलं आहे. याशिवाय ‘चोरासारखे येऊ नका, राजरोसपणे या, गाव आमच, तुमच सर्वाचे आहे, तुम्ही नियम पाळा, नक्कीच तुमचे स्वागत आहे, फक्त १४ दिवस अलगीकरण पाळा, अगदी घरातील कोणालाही स्पर्श करु नका, वस्तू एकत्रित वापरु नका, तुम्हाला किराणा, भाजीपाला, धान्याची गरज पडली तर फोन करुन सांगा, किंवा लांबूनच हाका मारा, अलगीकरणात राहीले म्हणजे गावातील लोंकाना तुमचा अभिमानच वाटेल, तुम्ही अलगीकरणात राहीले तर तुम्हाला हवी ती मदत गावकरी करतील, अगदी पैसे नसले तरी, तुम्ही गावाची व गावकऱ्यांची अलग राहुन काळजी घ्यावी, गावकरी तुम्हाला नक्कीच मदत करतील, लोकांत फिरुन आपला आपमान करुन घेऊ नका, गावाचे जबाबदार नागरीक बना, आपल्याकडे किंवा शेजारच्यांकडे बाहेरगावाहून कोणी आले तर लगेचच गावात सर्वांना कळवा, भल्या भल्याना करोना झाला व त्याने मृत्यू झाल्याचे दिसून येते आहे, आपला पाहुणा किंवा बाहेर गावावरून येणारा घरातील सदस्य यांना करोना होणारच नाही हा वेडपटपणा डोक्यातून काढून टाका, बाहेरगावाहून येणारा किंवा अनओळखी व्यक्तींबाबत योग्य ती काळजी घ्या, या गोष्टीचे पालन केले तर करोना व्हायरस आपल्या गावात प्रवेश करूच शकणार नाही. असे काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.