युवासेनेचे विपूल पिंगळेंनी दिला पदाधिकाऱ्यांना कानमंत्र ! ग्रामपंचायत- महापालिका निवडणुकीत करा जीवाचे रान

10Vi2 (2).jpg
10Vi2 (2).jpg

सोलापूर : जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून एका वर्षानंतर महापालिकीचीही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी युवासेनेच्या नुतन पदाधिकाऱ्यांनी जीवाचे रान करावे, असे आवाहन युवासेनेचे राज्य विस्तारक तथा सोलापूरचे संपर्कप्रमुख विपूल पिंगळे यांनी केले आहे. तसेच गावोगावी आणि शहरात शिवसेनेचा विस्तार वाढविताना जुन्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शक घेऊन त्यांनाही सोबत घ्या, असा कानमंत्रही त्यांनी दिला.

शहर आणि जिल्हा युवा सेनेच्या विधानसभानिहाय नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच युवा सेनेचे राज्य विस्तारक तथा सहसचिव विपुल पिंगळे यांच्या उपस्थितीत शिवस्मारक सभागृहात पार पडल्या. यावेळी युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी मनीष काळजे, शहर युवाधिकारी विठ्ठल वानकर आदी उपस्थित होते. अक्कलकोट विधानसभा, शहर मध्य, शहर उत्तर, शहर दक्षिण व ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. गाव तिथे शाखा आणि बूथ तिथे यूथच्या माध्यमातून युवासेनेच्या नुतन पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन युवासेनेचे शहरप्रमुख विठ्ठल वानकर यांनी यावेळी केले.  या निवडीबद्धल युवासेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम आणि राज्य विस्तारक विपुल पिंगळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर, शहरप्रमुख गुरूशांत धुत्तरगावकर यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.


नवे पदाधिकारी 'असे' आहेत... 
शहर दक्षिण विधानसभा : अमर बोडा (उपजिल्हा युवाधिकारी), अविनाश राठोड (विधानसभा युवाधिकारी), राहुल गंधुरे, विनोद घोडके, अमितकुमार गडगी (उपशहर युवाधिकारी), प्रद्युम्न भोसले (विधानसभा समन्वयक), सागर तांबोळकर (विधानसभा सहसमन्वयक), संकेत गोटे (शहर चिटणीस). शहर मध्य विधानसभा : रोहित हंचाटे (उपजिल्हा युवाधिकारी), सुरज शेख (विधानसभा युवाधिकारी), सागर शिंदे, अर्जुन शिवसिंगवाले, रवी कोकुल (उपशहर युवाधिकारी), सय्यद वसीम (विधानसभा समन्वयक), गणेश सुरवसे (विधानसभा सहसमन्वयक), अभिषेक दुडका (शहर चिटणीस). शहर उत्तर विधानसभा : ऍड. दयानंद शिंदे (उपजिल्हा युवाधिकारी), रणजित भंडारे (विधानसभा युवाधिकारी), प्रद्युम्न भोसले, ओंकार आवताडे, योगेश सलगर (उपशहर युवाधिकारी), गणेश परबत (विधानसभा समन्वयक), संगमेश्‍वर गुमटे (शहर चिटणीस). दक्षिण विधानसभा ग्रामीण, अक्कलकोट : काशी विभुते (उपजिल्हा युवाधिकारी, अक्कलकोट), विनोद मदने (शहर युवाधिकारी- अक्कलकोट), अवधूत कोरे (तालुका युवाधिकारी, अक्कलकोट), विशाल पवार, महेश बिराजदार, महेश गुंड (उपतालुका युवाधिकारी- अक्कलकोट), सौरभ अष्टे, राज अंटद (सोशल मीडिया सेल अधिकारी), धर्मराज बगले (तालुका युवाधिकारी, दक्षिण विधानसभा ग्रामीण) आणि आकाश साठे (उपतालुका युवाधिकारी, दक्षिण विधानसभा ग्रामीण).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com