माजी आमदार राजन पाटलांचा हा तुफान व्हायरल झालेला डान्स 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 23 February 2020

महाराष्ट्र पंचायतराज समितीचे माजी अध्यक्ष राजन पाटील आणि त्यांचे चिरंजीव राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्‍यराणा पाटील यांचा हा भन्नाट डान्स सोशल मिडियावर लाईक आणि कमेंटस्‌चा पाऊस पाडू लागला आहे.

सोलापूर : टिकटॉक असो की फेसबुक. इन्स्टाग्राम असो की व्हाटस्‌अप. तुमच्या अदाकारीला ही सोशल मीडिया एका रात्रीत हिरो करते. सोलापूरच्या राजकारणात परमनंट आमदार म्हणून ओळख असलेले मोहोळचे राजन पाटील यांचा डान्स सध्या सोशल मिडियामध्ये धुमाकूळ घालत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अनगरमध्ये (ता. मोहोळ, जि. सोलापूर) शिवप्रेमींनी काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील हा डान्स जीवनाच्या आनंदाचे दर्शन देऊन जात आहे. 
महाराष्ट्र पंचायतराज समितीचे माजी अध्यक्ष राजन पाटील आणि त्यांचे चिरंजीव राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्‍यराणा पाटील यांचा हा भन्नाट डान्स सोशल मिडियावर लाईक आणि कमेंटस्‌चा पाऊस पाडू लागला आहे. माणूस कितीही मोठा झाला तरीही त्याचे जीवनाचा आनंद घेतला पाहिजे यासह अनेक सकारात्मक प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी या डान्सची वाहवा केली आहे. सलग तीन वेळा मोहोळचे आमदार म्हणून राजन पाटील यांनी विधानसभेत काम केले आहे. 2009 पासून अनुसूचित जातीसाठी राखीव झालेल्या मोहोळ मतदार संघातून 2009, 2014 आणि 2019 निवडणुकीत राष्ट्रवादीचा आमदार विजयी करत हा मतदार संघ आपल्याकडेच ठेवण्यात राजन पाटील यशस्वी झाले आहेत. या कडक शिस्तीचे आणि निष्ठेच्या राजकारणासाठी राजन पाटील यांची ओळख आहे. शिवजयंतीमधील डान्समुळे राजन पाटील यांची नवी ओळख आता सर्वांना झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Viral dance of Rajan Patil of Mohol