पुणे विभागीय पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मोहोळ तालुक्‍यात मतदान यंत्रणा सज्ज 

Voting
Voting
Updated on

मोहोळ (सोलापूर) : कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे. मोहोळ तालुक्‍यात याबाबत योग्य ती दक्षता घेतली असून, मतदान केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्यांनी याबाबत जागरूक राहून सर्व निवडणूक प्रक्रिया पार पाडणे आवश्‍यक आहे, असे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी सांगितले. 

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीकरिता मोहोळ तालुक्‍यातील मतदान कर्मचारी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करताना तहसीलदार बनसोडे बोलत होते. या वेळी मार्गदर्शक सुधीर जोशी व महेश कोटीवाले हे उपस्थित होते. 

पदवीधर मतदारसंघासाठी मोहोळ तालुक्‍यात तीन हजार 333 मतदार असून, शिक्षक मतदार संघाकरिता 757 मतदार आहेत. 1 डिसेंबर रोजी सकाळी आठ ते दुपारी पाच या वेळेत मतदान होणार आहे. याकरिता प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून, पदवीधर निवडणुकीसाठी सात मतदान केंद्रे आहेत. शिक्षक उमेदवार निवडणुकीसाठी पाच मतदान केंद्रे असून पाच क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तीन भरारी पथके नेमण्यात आली आहेत. 

पदवीधर मतदार संघाकरिता मोहोळ दोन, नरखेड एक, शेटफळ एक, सावळेश्वर एक, टाकळी सिकंदर दोन अशी एकूण सात मतदान केंद्रे असून, शिक्षक मतदार संघाकरिता मोहोळ एक, नरखेड एक, शेटफळ एक, सावळेश्वर एक, टाकळी सिकंदर एक अशी पाच मतदान केंद्रे आहेत. या निवडणूक प्रक्रियेकरिता तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक नायब तहसीलदार राजशेखर लिंबारे, मोईन डोणगावकर, महेंद्र नवले, मनोज पुराणिक हे परिश्रम घेत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sharad pawar and mla abhijit patil
Solapur Development Work Hit By Election Code Of Conduct With 1483 Crore Water Project And 1024 Crore Flyovers Delayed
Barshi Farmers Raise Water Crisis Before Devendra Fadnavis Seek Permanent Water As Drought Impacts Farming And Families
mohol police pujari trusti meeting
Marathi News Esakal
www.esakal.com