esakal | जागे व्हा : तापमानवाढीचा अन्‌ कोरोनाचा नाही संबंध 
sakal

बोलून बातमी शोधा

sun heat

कोरोनाची लागण ही फक्त केवळ दोन प्रकारेच होऊ शकते. जो व्यक्ती परदेशातून (कोरोना बाधित) आला आहे त्याच्यापासून कोरोनाची लागण होऊ शकते. त्याचबरोबर कोरोना झालेल्या रुग्णाच्या संपर्कात दुसरा व्यक्ती आल्यास त्यालाही कोरोनाची लागण होण्याची शक्‍यता आहे. कोरोनाच्या विषाणूंची लागण हवेतून होत नसल्याने बाहेरच्या तापमानाचा आणि कोरोनाचा संबंध नाही. कोरोनाचा विषाणू त्या रुग्णाच्या शरीरात रहात असल्याने बाहेरच्या तापमानाचा आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही. 
- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर 

जागे व्हा : तापमानवाढीचा अन्‌ कोरोनाचा नाही संबंध 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापुरात एकीकडे तापमानाचा पारा भडकत असताना दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग रोखण्याची उपाय योजना दिवसेंदिवस तीव्र होत आहे. जगाला कोरोनाचे संकट भेडसावत असताना सोलापुरातील काही लोक मात्र बिनधास्त होते. वाढत्या तापमानात कोरोनाचा विषाणू टिकणार नसल्याच्या गैरसमजूत असलेल्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. तापमान वाढ आणि कोरोना यांचा काहीही संबंध नसल्याची स्पष्टोक्ती सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली. 
हेही वाचा - कोरोना : "या' महापालिकेत प्रवेशबंदी 
गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. 38.9 अंश सेल्सिअस पर्यंत सोलापूरच्या तापमानाचा पारा पोहोचला. वाढत्या तापमानामुळे कोरोनाचा विषाणू मरेल अशीच काहीशी समजूत अनेकांची झाली होती. तापमानवाढीचा आणि कोरोनाचा विषाणू नष्ट होण्याचा काहीच संबंध नसल्याचे आता समोर आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे आणि वारंवार हात व्यवस्थित धुणे हाच सध्या तरी एकमेव पर्याय मानला जात आहे.