
लवंग (सोलापूर) : मराठा समाजाला आरक्षण द्या, या मागणीसाठी सकल मराठा समाज, योद्धा प्रतिष्ठान व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवारी (ता. 5) अकलूज ते माळशिरस पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेचे आयोजन सकल मराठा समाज, योद्धा प्रतिष्ठान व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणावर पूर्ण महाराष्ट्र पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येक वेळेस खेळवले जात आहे आणि आरक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. मराठा समाजातील उच्चशिक्षित मुले आरक्षणाचा प्रश्न सुटला नसल्यामुळे बेरोजगार आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आजपर्यंत कित्येक बळी गेले आहेत. बीडमधील मराठा विद्यार्थ्याने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आत्महत्या केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापत आहे व चिघळत आहे. असे अजून किती विद्यार्थ्यांचे बळी केंद्र सरकार घेणार आहे, असा प्रश्न आयोजकांनी केला.
महाराष्ट्रामध्ये शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याआधी केंद्र सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावर विचार करावा व लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सकल मराठा समाज, योद्धा प्रतिष्ठान व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवारी सकाळी 7.30 वाजता अकलूज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व तसेच अकलूज येथील सर्व महामानवांच्या पुतळ्यांना अभिवादन करून अकलूज, संग्रामनगर, पाटील वस्ती, वटपळी मार्गे माळशिरस अशी पदयात्रा काढून माळशिरसच्या तहसीलदारांना तहसील कार्यालय, माळसिरस येथे निवेदन देण्यात येणार आहे. तरी सर्व जाती-धर्माच्या समाजबांधवांनी तसेच माळशिरस तालुक्यातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा बांधवांच्या आरक्षणाच्या लढ्यात सामील व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.