esakal | निर्धार कोरोनामुक्‍तीचा ! रेड झोनमधून ऑरेंज झोनमध्ये आला प्रभाग 15; आता उरले 14 रुग्ण 
sakal

बोलून बातमी शोधा

02Child_Mask_0.jpg

प्रभागाविषयक ठळक बाबी... 

  • एकूण 421 व्यक्‍ती आढळल्या पॉझिटिव्ह 
  • एकूण रग्णांपैकी 384 रुग्णांची कोरोनावर मात 
  • आतापर्यंत 23 रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी 
  • सध्या 14 रुग्णांवर सुरु आहेत रुग्णालयांत उपचार 

निर्धार कोरोनामुक्‍तीचा ! रेड झोनमधून ऑरेंज झोनमध्ये आला प्रभाग 15; आता उरले 14 रुग्ण 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : नोव्हेंबर महिन्यात शहरातील आठ हजार 871 संशयितांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्यात 209 रुग्ण आढळले असून एकूण टेस्टच्या तुलनेत शहरात रुग्ण आढळण्याचे प्रमाण सध्या 2.36 टक्‍के आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक 15 हा आता कोरोनामुक्‍तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. हा प्रभाग रेड झोनमधून ऑरेंज झोनमध्ये पोहचला असून प्रभागात आता केवळ 14 रुग्ण उरले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

प्रभागाविषयक ठळक बाबी... 

  • एकूण 421 व्यक्‍ती आढळल्या पॉझिटिव्ह 
  • एकूण रग्णांपैकी 384 रुग्णांची कोरोनावर मात 
  • आतापर्यंत 23 रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी 
  • सध्या 14 रुग्णांवर सुरु आहेत रुग्णालयांत उपचार 

नरसिंग गिरजी मिल चाळ, वारद चाळ, जुनी मिल चाळ, भैय्या चौक, हजरत खान चाळ या भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन घेऊन नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. नगरसेवक श्रीदेवी फुलारी, नगरसेवक चेतन नरोटे, विनोद भोसले, वैष्णवी करगुळे यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले. सुरवातीच्या काळात प्रभागातील 23 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. मात्र, मागील काही दिवसांत मृतांची संख्या पूर्णपणे घटली असून नगरसेवकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिक आता नियमांचे पालन करु लागले आहेत. दरम्यान, शहरात आतापर्यंत 31 ते 50 वयोगटातील सर्वाधिक तीन हजार 428 व्यक्‍तींना तर 16 ते 30 वयोगटातील दोन हजार 156 व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रभागातील नागरिकांनी सणासुदीत स्वत:बरोबरच कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन नगरसेवकांनी केले आहे. 

नागरिकांमुळेच प्रभागाची कोरोनामुक्‍तीकडे वाटचाल 
कोरोनाला थांबविण्यासाठी एकमेव उपाय असलेले मास्क घरोघरी वाटप केले. रॅपिड ऍन्टीजेन टेस्टवर भर देत आरोग्य शिबिरांचे आयोजन केले. अन्य नगरसेवकांच्या सहकार्यातून जनजागृतीवरही भर देण्यात आला. धान्य वाटप करुन नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. नागरिकांनी नियमांचे पालन करीत नगरसेवकांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. 
- विनोद भोसले, नगरसेवक 


कोरोनाच्या संकट काळात पाहिली नागरिकांची सुरक्षितता 
प्रभागातील नागरिक कोरोनापासून सुरक्षित राहावेत, संकट काळात गरजूंना घराबाहेर पडायला लागू नये म्हणून घरोघरी धान्य वाटप केले. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी केली. मास्क, सॅनिटायझरचे वाटप करुन घरोघरी जनजागृती केली. आता प्रभागातील काही भागात मागील काही दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. 
- श्रीदेवी फुलारी, नगरसेविका