निर्धार कोरोनामुक्‍तीचा ! संसर्ग वाढलेल्या प्रभाग सातमधील पेठांनी घेतला मोकळा श्‍वास 

तात्या लांडगे
Monday, 9 November 2020

 

प्रभागासंबंधी ठळक बाबी... 

 • आतापर्यंत 398 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह 
 • एकूण रुग्णांपैकी 21 जणांचा झाला मृत्यू 
 • 398 रुग्णांपैकी 365 रुग्णांची कोरोनावर मात 
 • सध्या सात रुग्णांवर सुरु आहेत रुग्णालयात उपचार 

सोलापूर : शहरातील मुस्लिम पाच्छा पेठ, तेलंगी पाच्छा पेठ, बेगमपेठ, विजापूर वेस, शनिवार पेठ, राहुल गांधी झोपडपट्टी या परिसरात सर्वाधिक रुग्ण वाढीची शक्‍यता होती. मात्र, नगरसेवकांच्या प्रयत्नातून 14 नंबर प्रभागाने आता मोकळ श्‍वास घेतला आहे. या प्रभागात सात ऍक्‍टिव्ह रुग्ण असून आतापर्यंत 365 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

प्रभागासंबंधी ठळक बाबी... 

 • आतापर्यंत 398 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह 
 • एकूण रुग्णांपैकी 21 जणांचा झाला मृत्यू 
 • 398 रुग्णांपैकी 365 रुग्णांची कोरोनावर मात 
 • सध्या सात रुग्णांवर सुरु आहेत रुग्णालयात उपचार 

 

महापालिकेच्या 14 नंबर प्रभागातील 398 व्यक्‍तींना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील 21 रुग्णांचा मृत्यू झाला असून या प्रभागात एकूण टेस्टच्या तुलनेत आतापर्यंत 1.76 टक्‍के व्यक्‍ती कोरोनाबाधित आढळल्या आहेत. एकूण टेस्टच्या तुलनेत कमी रुग्ण आढळणाऱ्यात हा प्रभाग अव्वल आहे. या प्रभागातील नगरसेवक तथा एमआयएमचे गटनेते रियाज खरादी यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका शहाजीबानो शेख, वाहिदाबानू शेख आणि नगरसेवक तौफिक हत्तुरे यांनी सामाजिक बांधिलकीतून जनसेवा केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रभागातील नागरिक सुरक्षित राहावेत, गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी मदत व्हावी, लहान मुलांना त्यांचे नियमित डोस मिळावेत, यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न केले. मोबाइल क्‍लिनिकच्या माध्यमातून पेठांमध्ये रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट मोहीम राबविली. तसेच मोफत आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून संशयितांचीही कोरोना टेस्ट करुन घेतली. गरजूंना धान्य, मास्क, सॅनिटायझर, साबण, औषधांचेही वाटप करीत नागरिकांमध्ये जनजागृती केली. त्यामुळे हा प्रभाग आता कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यापर्यंत पोहचला आहे. 

  नागरिकांची आरोग्य शिबिरांद्वारे केली तपासणी 
  गर्भवती महिला, बालकांवर कोरोना काळात उपचार व्हावेत, यासाठी प्रयत्न केले. कोरोना काळात प्रभागातील नागरिक सुरक्षित राहावेत म्हणून रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट, आरोग्य शिबिरे घेतली. को-मॉर्बिड रुग्णांवर वॉच ठेवत त्यांना वेळेत उपचार करण्यावर भर दिला. मोबाइल क्‍लिनिकद्वारे जागोजागी टेस्ट करून लोकांच्या मनातील भीती दूर केली. मास्क, सॅनिटायझर वाटप केले. 
  - वाहिदाबानू शेख, नगरसेविका 

  मास्क वाटप केल्यानंतर नागरिकांनी केले नियमांचे पालन 
  कोरोनाचा पहिला रुग्ण पाच्छा पेठेत सापडल्यानंतर एप्रिलमध्ये घरोघरी जाऊन नागरिकांचे थर्मल स्क्रिनिंग केले. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून संशयितांना मास्क, औषधांचे वाटप केले. पहिले रॅपिड ऍन्टीजेन टेस्टचे शिबिर प्रभागात राबविले. रुग्णसंख्या किंवा मृतांची संख्या वाढू नये म्हणून घरोघरी जनजागृती करीत नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. 
  - रियाज खरादी, नगरसेवक


  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: Ward No. 14 has now breathed a sigh of relief through the efforts of the corporators