बार्शी तालुक्‍यातील सर्वांत मोठ्या वैराग ग्रामपंचायतीची वॉर्ड रचना जाहीर ! 

gram_panchayat
gram_panchayat

वैराग (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील सर्वांत मोठ्या वैराग ग्रामपंचायतीची वॉर्ड रचना जाहीर झाली आहे. सहा वॉर्डात एकूण 17 ग्रामपंचायत सदस्य असून त्यामध्ये 9 महिलांचा समावेश आहे. वैराग ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने सध्या प्रशासकीय अधिकारी म्हणून एच. ए. गायकवाड यांची प्रशासनाने नियुक्ती केली आहे. 

वैराग व विस्तारित भागात एकूण सहा वॉर्ड संख्या आहे. वॉर्ड क्रमांक एकमध्ये आण्णाभाऊ साठे नगर, सिद्धार्थनगर, शिवाजीनगर असे भाग असून तीन सदस्य संख्या असणार आहेत. यात एक ओबीसी महिला व दोन एससी पुरुष असणार आहेत. वॉर्ड क्रमांक दोनमध्ये इंदिरानगर, संजयनगर, भुसार गल्ली, खडकपुरा असे भाग असून तीन सदस्य संख्या असणार आहे. यात दोन जनरल पुरुष, एक जनरल स्त्री असणार आहे. वॉर्ड क्रमांक तीनमध्ये वाणे गल्ली, तेले गल्ली, घोंगडे गल्ली, चाटे गल्ली भागांचा समावेश असणार आहे. यामध्ये दोन सदस्य संख्या असून एक ओबीसी स्त्री, एक जनरल स्त्री अशी सदस्य संख्या असणार आहे. 

वॉर्ड क्रमांक चारमध्ये संतनाथ मंदिर, कोष्ट वाडा, परीट गल्ली, दत्तनगर, कुरपट गल्ली असे भाग असणार असून यामध्ये तीन सदस्य संख्या असणार आहे. यात एक जनरल पुरुष, एक जनरल स्त्री, एक ओबीसी स्त्री असणार आहे. वॉर्ड क्रमांक पाचमध्ये निंबाळकर गल्ली, खेंदाड गल्ली, गाटे गल्ली, कसबा पेठ, केसकर गल्ली असे भाग असणार आहेत. यामध्ये तीन सदस्य संख्या असून एक जनरल पुरुष, एक जनरल स्त्री, एक ओबीसी OBC स्त्री असे सदस्य असणार आहेत. वॉर्ड क्रमांक पाचमध्ये बंगले गल्ली, कासार गल्ली, नेहरू चौक, शारदादेवी नगर, अहिल्यादेवी चौक असे भाग असणार आहेत. यामध्ये तीन सदस्य संख्या असून एक जनरल पुरुष, एक जनरल स्त्री, एक ओबीसी असे तीन सदस्य असणार आहेत. 

अशा सहा वॉर्डात सुमारे 14 हजार 500 मतदार संख्या असणार आहे. वैराग ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत स्थानिक दोन गटांत की तिसरी आघाडी तयार होऊन तीन गटात लढत होणार? यावर भूमकर विरुद्ध निंबाळकर या गटांचे पुढील राजकीय भवितव्य ठरणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com