सावधान..! "वीर'मधून 23 हजार क्‍युसेकचा विसर्ग; "या' नदीकाठच्या लोकांना पात्रात न जाण्याचा इशारा 

संतोष सिरसट 
Friday, 14 August 2020

एकीकडे वीर धरणातून पाणी सोडले आहे तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण पूर्णपणे भरले आहे. त्यामुळे त्या धरणातूनही 11 हजार क्‍सुसेकने पाणी सोडले जात आहे. ते पाणी आता उजनी धरणात येणार असल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. दोन दिवसांपासून सातारा आणि पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे वीर, भाटघर धरणात येणाऱ्या पाण्यात वाढ झाली आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी वीर धरणामधून नीरा नदीत 800 क्‍सुसेक विसर्ग विद्युतगृहातून सुरू केला होता. सायंकाळी पाच वाजता धरणातून 23 हजार 120 क्‍युसेक इतका विसर्ग केला आहे. 

सोलापूर : वीर धरणातून नीरा नदीपात्रामध्ये जवळपास 23 हजार क्‍सुसेकने पाणी सोडले जात आहे. त्यामध्ये जवळपास 50 हजार क्‍सुसेकने वाढ होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नीरा व भीमा नदीपात्रामध्ये कोणीही जाऊ नये, असा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. वीर धरणातून पाणी सोडल्यामुळे भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येण्याची शक्‍यता आहे. 

हेही वाचा : अबब..! "या' गावात एकाच कुटुंबातील 12 जण पॉझिटिव्ह 

एकीकडे वीर धरणातून पाणी सोडले आहे तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण पूर्णपणे भरले आहे. त्यामुळे त्या धरणातूनही 11 हजार क्‍सुसेकने पाणी सोडले जात आहे. ते पाणी आता उजनी धरणात येणार असल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. दोन दिवसांपासून सातारा आणि पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे वीर, भाटघर धरणात येणाऱ्या पाण्यात वाढ झाली आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी वीर धरणामधून नीरा नदीत 800 क्‍सुसेक विसर्ग विद्युतगृहातून सुरू केला होता. सायंकाळी पाच वाजता धरणातून 23 हजार 120 क्‍युसेक इतका विसर्ग केला आहे. 

हेही वाचा : सोलापूरच्या ग्रामीण भागात 241 नवे कोरोनाबाधित; एकूण संख्या 6772 

पुणे जिल्ह्यातील पावसावर उजनी धरणाचे भवितव्य अवलंबून आहे. पावसाळ्याच्या सुरवातीच्या काळात पुणे जिल्ह्यात पाऊस झाला नाही. त्या काळात धरण परिसरात पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली. वजा पातळीमध्ये गेलेले धरण अधिक पातळीत आले आहे. धरणात सध्या दौंड येथून सहा-सात हजार क्‍सुसेकने पाणी उजनी धरणात येत होते. पण, खडकवासला धरणातून पाणी सोडल्यामुळे आता धरणात येणारे पाणी वाढणार आहे. बंडगार्डन येथून भीमा नदीमध्ये 16 हजार 723 क्‍सुसेकने पाणी येत असल्यामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warning to the people along the Bhima river as 23000 cusec of water was released from Veer dam