सोलापुकरांनो पाणी जपून वापरा ! बुधवारपासून एकवेळ तेही चारदिवसाआड पाणी

तात्या लांडगे
Tuesday, 27 October 2020

ठळक बाबी... 

 • इंदापूर ते उजनी पंप हाउससाठी असलेले लाईट कनेक्‍शनची दुरुस्ती सुरु 
 • झाडे, वेली काढून अडथळा दूर करण्याचे काम महावितरणने घेतले हाती 
 • उजनी ते सोलापूर मुख्य पाईपलाईनवरील गळती दुरुस्तीचेही सुरु झाले काम 
 • शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला चार ठिकाणी गळती 
 • पाईपलाईन दुरुस्तीसाठी लागणार 24 ते 30 तासांचा अवधी 
 • शहर व हद्दवाढ भागात 28 ऑक्‍टोबरपासून एकवेळ आणि चार दिवसाआड पाणी पुरवठा 

सोलापूर : इंदापूर ते उजनी पंप हाउसपर्यंत 33 केव्ही एक्‍स्प्रेस फिडर लाईनवरील पोल परिसरात झाडीझुडपे वाढली आहेत. वेलीही वाढल्याने वारंवार लाईन ट्रीप होऊ लागली आहे. त्यामुळे महावितरणने आठ तासांचा शटडाऊन घेतला आहे. दुसरीकडे उजनी ते सोलापूर पाईपलाईनला चार ठिकाणी गळती लागली आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी 30 तासांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे 28 ऑक्‍टोबरपासून (बुधवारी) शहर व हद्दवाढ भागातील पाणी पुरवठा एकवेळ आणि चार दिवसाआड होईल, अशी माहिती प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंत्यांनी दिली.

ठळक बाबी... 

 • इंदापूर ते उजनी पंप हाउससाठी असलेले लाईट कनेक्‍शनची दुरुस्ती सुरु 
 • झाडे, वेली काढून अडथळा दूर करण्याचे काम महावितरणने घेतले हाती 
 • उजनी ते सोलापूर मुख्य पाईपलाईनवरील गळती दुरुस्तीचेही सुरु झाले काम 
 • शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला चार ठिकाणी गळती 
 • पाईपलाईन दुरुस्तीसाठी लागणार 24 ते 30 तासांचा अवधी 
 • शहर व हद्दवाढ भागात 28 ऑक्‍टोबरपासून एकवेळ आणि चार दिवसाआड पाणी पुरवठा 

सोलापूर ते उजनी पाईपलाईन जुनी झाल्याने सातत्याने गळती होऊन पाणी वाया जात आहे. दुसरीकडे महावितरणच्या माध्यमातून होणारा विद्युत पुरवठाही खंडीत होऊ लागला आहे. आता दोन्ही कामांची दुरुस्ती केली जात आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. हद्दवाढ भागातील पाईपलाईन जुनी असल्याने कमी दाबाने पाणी येते. नागरिकांना कमी वेळ पाणी मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यातच आता चार दिवसाआड आणि तेही एकवेळ पाणी पुरवठा होणार असल्याने नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहनही सार्वजनिक आरोग्य अभियंत्यांनी केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water once every four days from Wednesday