
अक्कलकोट (जि. सोलापूर) : कुरनूर (ता. अक्कलकोट) येथील धरणातून मागील आठवड्यात ठरलेल्या नियोजनानुसार गुरुवारी दुपारी तीन वाजता बोरी नदीत पाणी सोडण्यात आले. त्यामुळे अक्कलकोट शहरासह बोरी नदीकाठी असणारे गावकरी व शेतकऱ्यांची उन्हाळ्यात पाण्याची सोय झाली आहे.
आज पाटबंधारे उपअभियंता प्रकाश बाबा, शाखाधिकारी अमित शिंदे, नागनाथ उदंडे व प्रकाश लोंढे यांच्या उपस्थितीत तीन दरवाजे उघडून 900 क्युसेक प्रति सेकंद वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. धरणात 270 एमसीएफटी म्हणजेच 33 टक्के पाणी शिल्लक असून त्यातील 130 एमसीएफटी पाणी सोडले जाणार आहे, असे श्री. बाबा यांनी स्पष्ट केले. बोरी नदीकाठच्या शेतकऱ्यांनी नदीत पाणी सोडण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. सध्या कुरनूर धरणात 33 टक्के पाणीसाठा असून यावेळी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे धरण मृत साठ्यात जाणार आहे. आपल्याकडे पावसाळा दरवर्षी ऑगस्ट महिन्यात येऊन पावसाळ्याच्या शेवटी धरण भरते असा नेहमीचा अनुभव आहे. त्यामुळे पाणी सोडण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर उरलेले पाणी जवळपास तीन महिने वापरावे लागणार आहे.
कुरनूर येथील धरणातून आज पाणी सोडण्यात आले. बोरी नदीकाठच्या गावातील पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे. आता अक्कलकोट नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाने पाणी धरणातून उचलताना आवश्यक तितकेच घेऊन शहरातून सोडताना वाया जणार नाही याचे विचारपूर्वक नियोजन करावे लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.