बार्शीचा पाणीपुरवठा सुरळीत करा : राजेंद्र मिरगणे

भाजप नेते राजेंद्र मिरगणे
भाजप नेते राजेंद्र मिरगणे
Updated on

बार्शी (सोलापूर) : मागील दोन वर्षांपासून बार्शी शहराला उजनी जलाशयातून होणारा पाणी पुरवठा वारंवार खंडीत होत असून पाणी पुरवठा तांत्रिक अडचणींची लाखोंची बिले दिली जातात. पण नागरिकांना तीन ते चार दिवसाआड पाणी मिळते. पालिका पाणीपट्टी मात्र वर्षभराची घेते. नागरिकांनी पाणीपट्टी भरु नये, असे आवाहन भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांनी पत्रकार परिषदेत केले. 

शहरात विविध नागरी समस्यांना शहरवासियांना तोंड देत आहे. पण प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करीत नाही. रस्ते खराब झाले आहेत. दोन दिवसांच्या पावसाने नागरिकांच्या घरात पाणी शिरले. पाणीपुरवठा व्यवस्थित नाही. यासाठी आता रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असून प्रशासनाला कायदेशीरपणे जाब विचारणार आहे. मागील सात महिन्यांपासून देशासह राज्य लॉकडाउन परिस्थितीत असताना अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे पालिकेने सात महिन्याची घरपट्टी-पाणीपट्टी घेऊ नये. यासाठी आंदोलन उभा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

चांदणी प्रकल्पातून पाणी पुरवठा योजनेसाठी तीन ते चार कोटी रुपये खर्च केलेले असताना व सध्या धरण पाण्याने भरलेले असताना पालिका पाणी घेत नाही.  कोरोना संसर्गामध्ये तालुका होरपळलेला असताना खासगी रुग्णालयात रुग्णांना पैशाअभावी जाता येत नाही. त्यामुळे राज्यात सर्वात जास्त मृत्यूचे प्रमाण बार्शी तालुक्‍यात आहे.

जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे मागणी करुन पाठपुरावा केल्यानंतर बार्शी व पांगरी येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णांची सोय करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदिप ढेले यांच्याकडून प्राप्त झाले आहेत, असेही मिरगणे यांनी यावेळी सांगितले. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

IPS solapur SP Atul Kulkarni
 Tukaram Mundhe
civil hospital
Minor Argument Turns Fatal: 24-Year-Old Auto Driver Murdered in Pandharpur
Marathi News Esakal
www.esakal.com