
बार्शी (सोलापूर) : अवघ्या अडीच एकर क्षेत्रात मागील वर्षी कांद्याचे चांगले उत्पन्न मिळूनही एका पिकात आंतरपीक घेऊन दोन्ही पिकांचे उत्पन्न मिळेल असा प्रयोग श्रीपतपिंपरी येथील सरपंचाने यशस्वी करून दाखवला असून, केळीमध्ये घेतलेले कलिंगडाचे पीक 85 टन झाले आहे. 70 टन कलिंगडे सौदी देशात विक्री केली आहेत. अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळाल्याचा वेगळाच अनुभव आला असून यशस्वी झालो, असे सरपंच कल्पना रामराजे ताकभाते, त्यांचे पती तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामराजे भैरवनाथ ताकभाते यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
मागील वर्षी अडीच एकर क्षेत्रात कांद्याचे पीक घेतले. त्यातून साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळाले. पण यावर्षी कांद्याचे पीक घ्यायचे नाही, असे ठरवून गावातील प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय व्यवहारे व दीनानाना ताकभाते यांच्याशी चर्चा केली अन् केळी पिकामध्ये कलिंगडाचे पीक घ्यायचे ठरवले.
केळीची 3 हजार 500 रोपे जळगाव येथून खरेदी केली आणि अवकाळी पाऊस मोठा झाला. सलग तीन दिवस शेतात पाणीच पाणी झाल्याने केळीची रोपे घरीच उतरवून ठेवली. शेतातील पशुधन पाण्यातून वाचवले पण गोठ्यामध्ये ठेवलेले ड्रीप व इतर साहित्य वाहून गेले.
ताकभाते सांगत होते, परत शेती मशागतीसाठी दोन महिने गेले पण हरलो नाही. विहीर नाही, बोअरमधून ड्रीपद्वारे शेतीला पाणी देतो. शेतामध्ये केळीची लागवड करून मॅक्स जातीच्या कलिंगडाचे आंतरपीक घेतले. 65 दिवसांत पीक येते, असे माहीत होते. सेंद्रिय खत, फवारणी, शेतमजूर असा एक लाख रुपये खर्च कालिंगड्यासाठी आला. बाग पाहायला कुर्डुवाडीचे व्यापारी कदम आले. 40 टन कलिंगडे होतील असा अंदाज काढला पण 70 टन पीक त्यांनी खरेदी केले तरी संपेना. ही कलिंगडे त्यांनी सौदीला पाठवली आणि चार लाख रुपये उत्पन्न मिळाले. अजूनही बागेत 15 टन कलिंगडे शिल्लक राहिली. बार्शी बाजारपेठेत तसेच गावात, मित्र परिवारांना कलिंगडे दिली.
केळीच्या पिकात कलिंगड आंतरपीक घेऊन केळीचा खर्च निघेल असा प्रयोग केला, तो यशस्वी झाला. पावसामुळे साडेतीन हजार पैकी 2 हजार 180 रोपे आली आहेत. थोडे नुकसान झाले पण शेतीमध्ये आर्थिक व्यवहार व्यवस्थित ठेवले तर शेतमजुरांची अडचण येत नाही. कालिंगडाचे उत्पन्न निश्चित उपयोगी पडले आहे अन् कोणताही त्रास न होता पैसे शिल्लक राहिले.
- रामराजे ताकभाते,
प्रयोगशील शेतकरी, श्रीपतपिंपरी
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.