हेल्मेट घाला अन्यथा दुचाकी होईल जप्त ! आरटीओची 31 ऑक्‍टोबरपर्यंत विशेष मोहीम

तात्या लांडगे
Sunday, 18 October 2020


ठळक बाबी...

 • दुचाकीस्वारांचे अपघातात स्वसंरक्षण व्हावे म्हणून हेल्मेट वापरणे बंधनकारक
 • बेशिस्त वाहनांवर 31 ऑक्‍टोबरपर्यंत सुरू राहणार शहर- जिल्ह्यात कारवाई
 • योग्यता प्रमाणपत्र नाही, विमा, पीयुसी नसलेल्या वाहने असतील टार्गेट
 • आरटीओ कार्यालयाने कारवाईसाठी नियुक्‍त केले दोन वायुवेग पथके
 • स्कूल बस सुरू करण्याचा निर्णय नाहीच; बेशिस्त मालवाहतूक व दुचाकींवर होतेय कारवाई

सोलापूर : विमा नसतानाही वाहन चालविणे, फिटनेस तथा पीयुसी (प्रदूषण) प्रमाणपत्र नाही, दुचाकीस्वारांकडे हेल्मेट नाही अशा वाहनांवर आरटीओ अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जात आहे. दुचाकी आणि अन्य वाहनाच्या अपघातात दुचाकीस्वार मृत्यू होण्याचे कारण हेल्मेटच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालणे बंधनकारक असून विनाहेल्मेट गाडी चालविणाऱ्यांची दुचाकी जप्त करण्याची कारवाई हाती घेण्यात आली आहे. 31 ऑक्‍टोबरपर्यंत राज्यभर विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय परिवहन आयुक्‍तालयाने घेतला आहे.

लॉकडाउननंतर असंख्य वाहने रस्त्यांवर आली आहेत. या पार्श्‍वभूमीवर उपप्रादेशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी विजयपूर रोडवर कारवाई सुरू केली आहे. रविवारी (ता. 18) त्यांनी आठ रिक्षा, 54 दुचाकी, चारचाकी नऊ आणि मालवाहतूक आठ वाहनांवर कारवाई करण्यात आली. ही बेशिस्त वाहने जप्त केली आहेत. यावेळी वायुवेग पथकातील महेश रायबान, सुहास ठोंबरे, ऐश्‍वर्या डल्लू, शिवाजी सोनटक्के, अक्षय जाधव, विद्यादेवी शिंदे, अतुल दराडे, प्रशांत वनवे, वाहनचालक श्री. महाडिक, राकेश कांबळे हे अधिकारी उपस्थित होते. प्रदूषण प्रमाणपत्र नसणे आणि विमा व हेल्मेटविना असलेल्या दुचाकीचा समावेश आहे. या बेशिस्त वाहनांना तीन लाख 76 हजार चारशे रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ही कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, पोपट पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

  हेल्मेट न घातल्यानेच सर्वाधिक दुचाकीस्वारांचा मृत्यू
  सोलापूर शहर- जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण अधिक असून त्यात दुचाकीस्वारांचा सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी सोमवारपासून (ता. 19) 31 ऑक्‍टोबरपर्यंत विशेष मोहीम राबविली जाणार आहे. दुचाकीस्वारांनी स्वत:चा जीव वाचविण्यासाठी हेल्मेट घालणे बंधनकारक असेल.
  - संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

  ठळक बाबी...

  • दुचाकीस्वारांचे अपघातात स्वसंरक्षण व्हावे म्हणून हेल्मेट वापरणे बंधनकारक
  • बेशिस्त वाहनांवर 31 ऑक्‍टोबरपर्यंत सुरू राहणार शहर- जिल्ह्यात कारवाई
  • योग्यता प्रमाणपत्र नाही, विमा, पीयुसी नसलेल्या वाहने असतील टार्गेट
  • आरटीओ कार्यालयाने कारवाईसाठी नियुक्‍त केले दोन वायुवेग पथके
  • स्कूल बस सुरू करण्याचा निर्णय नाहीच; बेशिस्त मालवाहतूक व दुचाकींवर होतेय कारवाई

  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: Wear a helmet otherwise the bike will be confiscated! RTO's special campaign till October 31