मोहोळमधून करमाळ्यात का आणली ‘ती’ लोक?

अण्णा काळे
शनिवार, 18 एप्रिल 2020

भिवंडीहुन गुलबर्गाकडे निघालेले दोन टेम्पो मोहोळ पोलिसांनी बुधवारी (ता. १५) पकडले. यावेळी चालकांनी आम्ही करमाळा मार्गे सोलापूर जिल्ह्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर करमाळा पोलिसांनी हे सर्व कामगार परत करमाळा येथे आणले. सध्या कोरोना रोगाविषयी लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. वास्तविक पाहता सरकारच्या आदेशानुसार संचारबंदीच्या काळात ज्या ठिकाणी प्रवासी पकडले जातील त्याच ठिकाणी त्यांना क्वारंटाइन करण्यात येत आहे.

करमाळा (सोलापूर) : भिवंडीहून गुलबर्गाकडे जाणाऱ्या परप्रांतीय 105 जणांना मोहोळहुन करमाळा येथे पोलिसांनी परत आणुन गौंडरे (ता. करमाळा) येथे क्वारंटाइन केले आहे. कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. या लोकांना करमाळा तालुक्यात ठेवल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या लोकांची योग्य त्या ठिकाणी सोय करावी व पोलिसांनी अशी भुमीका का घेतली याची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे. तसे निवेदन त्यांनी पाठवले आहे. 
निवेदनात म्हटले की, भिवंडीहुन गुलबर्गाकडे निघालेले दोन टेम्पो मोहोळ पोलिसांनी बुधवारी (ता. १५) पकडले. यावेळी चालकांनी आम्ही करमाळा मार्गे सोलापूर जिल्ह्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर करमाळा पोलिसांनी हे सर्व कामगार परत करमाळा येथे आणले. सध्या कोरोना रोगाविषयी लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. वास्तविक पाहता सरकारच्या आदेशानुसार संचारबंदीच्या काळात ज्या ठिकाणी प्रवासी पकडले जातील त्याच ठिकाणी त्यांना क्वारंटाइन करण्यात येत आहे. शासनाचा आदेश डावलून पोलिसांनी या लोकांना करमाळ्यात परत आणण्याचा उद्देश काय? भिवंडी, ठाणे, मुंबई या भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच भागातील लोक करमाळा येथे ठेवल्यामुळे करमाळा तालुक्यातील लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांची भीती कमी करण्यासाठी या भिवंडीहुन आलेल्या लोकांना योग्य त्या ठिकाणी ठेवण्यात यावे.

माजी आमदार पाटील यांची मागणी
मोहोळमध्ये पकडलेले प्रवासी करमाळा येथे आणण्याचे काय कारण? एकतर कोरोना रोगाच्या भीतीने लोक घाबरले आहेत, असे असताना मोहोळमध्ये सापडलेले लोक परत करमाळ्यात घेऊन येणे हे चुकीचे आहे. पोलिसांनी हे लोक मोहोळहुन करमाळ्यात आणण्याचा उद्देश काय? असे करण्या पाठीमागचा नेमका उद्देश काय? भिवंडीवरून आलेले हे जे कामगार आहेत त्यांची सोय करमाळा सोडुन इतरञ योग्य त्या ठिकाणी करावी, अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What did Narayan Patil demand from the Chief Minister