शिक्षकांच्या बदल्याबाबत काय म्हणाले ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ? ते वाचा 

shikshak.jpg
shikshak.jpg

मंगळवेढा(सोलापूर)ः राज्यातील जि. प.प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या बदल्या शिक्षक व विद्यार्थी हिताचा विचार करुनच केल्या जातील, अशी ग्वाही राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिली आहे. 

शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी ही माहिती दिली.

आज राज्याचे बदली धोरण व शिक्षकांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदधिकारी यांच्या सोबत जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या बैठकीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. या वेळी प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, पुणे जिल्हासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, उस्मानाबाद जिल्हासंघाचे अध्यक्ष संतोष देशपांडे, सातारा जिल्हा संघाचे अध्यक्ष चंद्रकांत यादव व पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी आपण फक्त गैरसोय झालेल्या शिक्षकांच्याच बदल्या करू अनावश्‍यक बदल्या होणार नाहीत तसेच बदल्यात संपुर्ण पारदर्शकता असेल, बदल्याची गरज असेल तरच आपण बदल्या करू असे स्पष्ट केले. 
त्यात प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळेतील सन 2018 व 2019 मध्ये रेण्डम राऊंड, विस्थापित होऊन व समायोजनामध्ये गैरसोय झालेल्या शिक्षकांची विनाअट बदली करण्यात यावी. या बदल्या करताना समानिकरणच्या नावाखाली रिक्त ठेवलेल्या जागा दाखवण्यात याव्यात. प्रशासकीय कारणावरुन तालुका बाहेर बदली करण्यात येऊ नये. बदल्याची खोखो पद्धत बंद करण्यात यावी. त्यासोबतच शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या पदोन्नती करण्यात यावी. आंतरजिल्हा बदलीसाठी राज्य रोष्टर ग्राह्य धरावे. संगणक प्रशिक्षण नसलेल्या शिक्षकांची सेवानिवृतीच्या वेळी वेतनवाढ वसुली थांबवावी. कोविड 19 संसर्गाची पार्श्वभूमी लक्षात बदली प्रक्रिया ऑनलाईनच राबवावी या बाबींवर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी संतोष देशपांडे यांनी आभार मानले.  
 

संपादन ः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com