कोरोनानंतरच्या शाळा असतील तरी कशा

EDUCATION.jpg
EDUCATION.jpg
Updated on

सोलापूर ः नवे शैक्षणिक वर्ष लॉकडाउनमुळे लांबणार असले तरी या निमित्ताने कोरोना लस जितक्‍या लवकर मिळेल तेवढी ती विद्यार्थ्यांसाठी सर्वात सुरक्षित साधन असेल यावर शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे एकमत होऊ लागले आहे. 
कोरोना संकटानंतरचे शिक्षण या विषयावर सध्या अनेक प्रकारचे वेबिनार, ऑनलाइन चर्चा सुरू आहेत. सोशल मीडियावर देखील ही मंडळी चर्चा करू लागली आहेत. 
शाळा सुरू होण्याचा कालावधी हा जूनपासून असतो. आता लॉकडाउन मे अखेरपर्यंत आहे. त्यातही तिसऱ्या टप्प्यात राज्यातील काही शहरे रेड झोनमध्ये असल्याने तेथील शैक्षणिक कामकाज लांबणार असल्याच मानले जाते. 

नव्या शैक्षणिक वर्षात कोरोनामुळे नेमक्‍या गोष्टी कराव्या लागणार याचे नियोजन सुरू झाले आहे. मुलांनी मास्क वापरणे बंधनकारक राहणार. बाथरूम्स, स्कूल बस, शाळा परिसर सॅनिटायझेशन होणार याची जबाबदारी शाळेला अधिक काळजीने घ्यावी लागणार आहे. कोविड-19 वर लस (vaccine) लवकर मिळावी. 
शाळा कधी सुरू होतील सांगू शकत नाही. 

प्राथमिक व माध्यमिकच्या वर्गांना ऑनलाइन शिक्षण आता फार गरजेचे नाही. शालेय वर्ष उशिरा सुरू झाले तर वर्षभरातील सुट्या कमी केल्या तर सर्व अध्यापन पूर्ण होऊ शकेल. आता शाळेच्या कामात आरोग्य व स्वच्छतेचा मुद्दा प्राधान्याचा होणार आहे. अँड्रॉइड फोनपेक्षा शालेय अभ्यासावर एखादे दूरचित्रवाणीची वाहिनी सर्वसामान्य माणसाला अधिक स्वस्त पडू शकणार आहे. उशिराच शाळा सुरू झाल्यातर अभ्यासक्रम कमी करता येणे शक्‍य होईल. स्वच्छ पाणी, स्वच्छ पर्यावरण, मास्क, सॅनिटायझर याचा विचार शाळेसाठी व्हायला हवा. राज्यभरातील अनेक शिक्षण तज्ञ व संशोधक कोरोनानंतरचे शालेय शिक्षण कसे असेल यावर विचारमंथन करीत आहेत. येत्या महीनाभरात निदान काही कोरोनामुक्त भागात शाळा सुरू करायच्या असतील अनेक प्रकारच्या सुधारणा कराव्या लागणार आहेत. गर्दी न होता विद्यार्थ्यांना शिक्षण कसे मिळावे यासाठी विशेष धोरण राबवावे लागणार आहे. 


शिक्षणात काय होतील बदल 
लस विद्यार्थ्यासाठी सर्वाधीक सुरक्षीत 
शाळामध्ये स्वच्छता व आरोग्याला मिळेल प्राधान्यॉ 
ऑनलाईन शिक्षणाचा उपयोग फारसा महत्वाचा नाही 
शालेय अध्यापनावर टीव्ही वाहीनी ठरेल उपयुक्त 
सोशल डिस्टनसींग नुसार विद्यार्थ्यांना आसन व्यवस्था 
शाळा उशीरा सुरू झाल्यातर अभ्यासक्रमात कपात शक्‍य  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com